Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

उन्हाची तीव्रता…अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 3, 2026
in शैक्षणिक
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
राज्यात वाढत्या उन्हाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याचा तसेच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भीषण परिस्थितीचा विचार करता, अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट एक महिन्याची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने अध्यक्षा जयश्री वाबळे-झावरे यांनी दिले आहे.

​सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागला आहे. अशा कडक उन्हामध्ये अंगणवाडीत येणाऱ्या लहान बालकांसह गरोदर आणि स्तनदा माता यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत अंगणवाडी सेविका १५ दिवस आणि मदतनीस १५ दिवस अशा आळीपाळीने उन्हाळी सुट्ट्यांचा लाभ घेतात. मात्र, या काळातही अंगणवाडी सुरूच ठेवावी लागते. ग्रामीण भागात अनेक अंगणवाड्या दुर्गम भागात असल्याने, तेथे बालके येत नसतानाही केवळ सेविका किंवा मदतनीस यांना पूर्ण वेळ अंगणवाडीत उपस्थित राहण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

​गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका अंगणवाडी शिक्षिकेचा उन्हाच्या तीव्रतेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील एका अंगणवाडीच्या लाभार्थ्यासोबत घडलेल्या अनुचित घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

​अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शासनाला पूर्ण सहकार्य दर्शवत, पोषण ट्रॅकरवरील सर्व कामे पूर्ण करून देण्याची तसेच बालकांचा आहार घरपोच देण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोना काळाप्रमाणेच हा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

​हे निवेदन देताना अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या अध्यक्षा जयश्री वाबळे-झावरे, उपाध्यक्ष छाया सारबंदे, सचिव संगीता गागरे-उंडे आणि नगर अध्यक्ष प्रभावती सत्रे उपस्थित होत्या. तसेच समन्वय समितीचे पदाधिकारी रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे आणि संजय मापले यांचे ही सहकार्य लाभले. प्रशासनाने या संवेदनशील विषयावर तात्काळ निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना सरसकट एक महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
सध्या तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अशा भीषण परिस्थितीत लहान बालके, गरोदर व स्तनदा माता यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटना पाहता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोषण ट्रॅकरची कामे आणि आहाराचे वाटप आम्ही घरपोच करू, पण कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ थांबवून प्रशासनाने त्यांना सरसकट एक महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी.

जयश्री वाबळे-झावरे (अध्यक्षा : अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ

Previous Post

जळगावातील ऑर्किड हॉस्पिटलचा मनमानी कारभार; लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल!

Next Post

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

Next Post

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..