Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रात्रीचा थरार…! टोल नाक्यावर ‘त्या’ आयशरला एलसीबीच्या पथकाने घेरलं..आत तपासणी केली असता ७० लाखांचं गुटखा जप्त..

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 7, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना):-रात्रीची शांतता…हिवरगाव टोल नाक्यावर पोलिसांचा गुप्त सापळा…आणि संगमनेरच्या दिशेने वेगाने येणारा ‘तो’ विटकरी रंगाचा आयशर टेम्पो! पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या एका गुप्त आदेशाने अशी काही चक्रे फिरली की,गुजरातहून पुण्याकडे निघालेल्या गुटखा माफियांच्या साम्राज्याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सुरुंग लावला आहे.तब्बल ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाला एका खबऱ्याकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती.

एक आयशर टेम्पो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा घेऊन संगमनेर मार्गे पुण्याला जाणार आहे.माहिती मिळताच पथकाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हिवरगाव टोल नाक्यावर दबा धरला.मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आयशर (क्र. MH-43-BX-2779) दिसताच पोलिसांनी त्याला घेराव घातला. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली,पण जेव्हा पोलिसांनी गाडीची झडती घेतली,तेव्हा आतलं दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले.पोत्यांखाली लपवलेला लाखो रुपयांचा ‘मौत का सामान’ (गुटखा) पोलिसांच्या हाती लागला.पोलिसांनी घटनास्थळावरून १)कन्हैय्यालाल कालुराम गेहलोत (राजस्थान),२)प्रदिपकुमार हरीशंकर कुंवार (मध्य प्रदेश),३)लक्ष्मण बस्तीराम पवार (राजस्थान) या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.तपासात धक्कादायक माहिती समोर आली की,हा माल वापी (गुजरात) येथून भरला होता आणि तो पुण्यातील निलेश ललवानी नावाच्या व्यक्तीकडे जात होता.ललवानी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आर.एम.डी. पानमसाला: २८,४४,००० रुपये,रजनिगंधा पानमसाला:१२,०६,४०० रुपये,सुगंधी तंबाखू व जर्दा: ७ लाख रुपयांहून अधिक,आयशर टेम्पो व मोबाईल: २२,३०,००० रुपये एकूण किंमत: ६९,७९,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक दिपक मेढे,राहुल द्वारके,भिमराज खर्से,राहुल डोके,सतिष भवर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ‘मास्टरमाईंड’ ललवानीच्या अटकेनंतर अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे

Previous Post

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना

Next Post

अवैध गौण खनिज प्रकरण : प्रामाणिक अधिकाऱ्यावरच कारवाई? दबावाखाली तहसीलदारांविरुद्ध प्रस्तावाचा संतापजनक प्रकार

Next Post

अवैध गौण खनिज प्रकरण : प्रामाणिक अधिकाऱ्यावरच कारवाई? दबावाखाली तहसीलदारांविरुद्ध प्रस्तावाचा संतापजनक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..