Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 8, 2026
in क्राईम
0

बीड/प्रशांत बाफना
बीड जिल्ह्यातील जायकवाडी भूसंपादन घोटाळयात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात भूसंपादनाच्या कामात बनावट सह्या वापरुन जुन्या तारखेत भूसंपादनाचे सुमारे ७२ कोटी रुपये अदा करण्यात आले होते. तर सुमारे २४१ कोटी ६२ रुपयांचे घोटाळा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीचे नमुनेही तपासणीस पाठविले होते. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील या भूसंपादन घोटाळ्यात काही कर्मचाऱ्यांचे व्हॉटस् ॲप वरील संभाषण आणि बनावट सह्यांचे नमुने गोळा करुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात अविनाश पाठक यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक केल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे सध्या रजेवर आहेत. अतिरिक्त पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात पूर्वी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एम व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाााली सुरू होता.
बीड जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी बिडमध्ये गुन्हा दाखल झाला होता.बीड मधील वरिष्ठ भूसंपादन कार्यालयाच्या १५४ प्रकरणात जवळपास २४१ कोटी ६२ लक्ष रुपये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आले होते . या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एक विशेष तपास स्थापन करण्यात आली होती. या पथकाने बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या चौकशी समिती पुढे हजर झाले

Previous Post

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

Next Post

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी

Next Post

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..