Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 12, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” हे शिबीर मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळा, यावल येथे मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
या भव्य शिबिराचे उद्घाटन मा. आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगराध्यक्ष छाया पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, तालुका स्तरीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना आणि महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण दाखले, प्रमाणपत्रे व लाभांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
शिबिरामध्ये देण्यात आलेले प्रमुख लाभ :
जिवंत सातबारा वाटप
एकूण वारस नोंदी – 108
प्रातिनिधिक वाटप – 28
उत्पन्न दाखले वाटप – 22
शिधापत्रिका वाटप – 12
जात प्रमाणपत्र वाटप – 54
तुकडा शेरा कमी करून सातबारा वाटप – 21
अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे – 18
विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी – 45
लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप – 01
आदिवासी खातेदार नोंदी – 05
श्रवण यंत्र वाटप – 05
या शिबिरामुळे अनेक नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसूल विषयक कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन सेवा देत असल्याने शासनाच्या लोकाभिमुख धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागासह सर्व संबंधित विभागांनी विशेष परिश्रम घेतले. यावल तालुक्यात आयोजित या शिबिराची नागरिकांमध्ये दिवसभर चर्चा रंगलेली दिसून आली.

Previous Post

रावेर तालुक्यात सुकी नदीपात्राची खुलेआम लूट; वाळू-माती माफियांचा धुमाकूळ, तहसीलदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..