Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल तालुक्यातील हरिपुरा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाची महापंचायत सभा संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 18, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक मन्सूर तडवी

यावल.हरिपुरा येथे दि.१७/५/२६ रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत आदिवासी तडवी भिल्ल जमातीची महापंचायतची मीटिंग आयोजित केली होती या आदिवासी (मीटिंग) मेळाव्यात कोणतेही व्यासपीठ किंवा स्टेज खुर्च्या नव्हत्या एकदम साध्यापणाने मी नाही तर आपण असे सर्वच आदिवासीं समाज बांधव यांचे प्रतीक दिसून आले आजी-माजी राजकीय पुढारी अधिकारी वर्ग सर्व सामान्य माणूस सर्वांनी खालीच बसू असा एकच सूर सर्वांचे मुखाने निघत गेला
या सभेमध्ये रावेर, चोपडा,यावल जळगाव भुसावळ, पुणे, नाशिक, मुंबई. बुलढाणा आणि कोकण येथून समाजातील बहुसंख्येने समाज बांधवांची उपस्थिती दिसून येत होती आदिवासी तडवी भिल समाज महापंचायतचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे
१)तडवी भिल समाजात गावोगावी एकता निर्माण करणे.
२)शिक्षणाचा प्रसार व विद्यार्थ्यांना मदत करणे.
३)समाजातील युवकांना रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन करणे
४)महिलांचे सक्षमीकरण व स्वावलंबन करणे
५)समाजातील वाईट प्रथा, व्यसन व अंधश्रद्धा कमी करणे.
६)शासनाच्या योजना घरोघरी जाऊन समाजापर्यंत पोहोचवणे.
७) आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा व परंपरा जतन करणे.
८)सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवणे.
९) गावोगावी समाजातील तंटे संवादाने मिटविणे.
१०)संविधानिक हक्कांसाठी शांततामय लढा उभारणे.
११) नव्यानेच निर्माण झालेल्या समाजातील काही रूढी बंद करणे उदा. यात्रा संदल मध्ये दहा ते बारा बँड वाजे यावर विचार करणे. लग्नांमध्ये पैशाची उधळण पट्टी आणि वेळेवर लग्न लागणे
१२) लग्नपत्रिका ही आता लांबच्या अंतरावर काही गावे शहरांमध्ये व्हाट्सअप वर लग्नपत्रिका स्वीकार करणे
१४) २०२६,२७ या वर्षी होत असलेल्या जनगणने विषयी मार्गदर्शन चर्चा करणे. इत्यादी महापंचायत ची उद्दिष्टे आहेत.
सर्व समाजबांधवांनी एकमताने, महापंचायत व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती समाजातील ज्येष्ठ नेते यांनी आपली मते परखडपणे मांडली. काही समाज सेवकांना वेळेअभावी आपली मते मांडता आली नाही. परंतु समाजा विषयी त्यांची तळमळ दिसून आली.
होतकरू तरुण आणि दिर्घकाळ समाजसेवा केलेल्या समाजसेवक या सर्वांनी महापंचायत मध्ये स्वतःहुन काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जवळपास ६० पेक्षा अधिक लोकांनी आपली नावे नोंदवली आहेत. अजूनही नावे येण्याची शक्यता आहे.
यातील प्रत्येक गावात गांवपंचायत,तालुका पंचायत जिल्हा पंचायत अशी रचना केली जाणार आहे. प्रत्येक घटकाचा विचार केला जाणार आहे. वेळेअभावी काही गोष्टी राहून गेल्या असतीलही. प्रत्येकाचे १०० टक्के समाधानही होणे अपेक्षित होते. पण थोडेफार राहून गेले. पण चांगले घडण्यासाठी, घडवण्यासाठी मुहूर्तमेढ झाली आहे.
यातच आनंद आहे.
या सभेसाठी खूप लोकांनी आर्थिक सहकार्य केले. सभामंडप, सरबत पाणी, स्पिकर व्यवस्था या सहकार्य करणारे हरिपूरा येथील बांधवांची तळमळ दिसून आली.

Previous Post

यावल पोलीसांचे दारूबंदी पथक सज्ज; साकळीतील अवैध गावठी दारू व्यवसायावर आता मोठी कारवाई होणार!

Next Post

श्रीगोंदा शहरात मावा, गुटखा व नशीले पदार्थांची विक्री वाढली; लहान वयातील मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात…

Next Post

श्रीगोंदा शहरात मावा, गुटखा व नशीले पदार्थांची विक्री वाढली; लहान वयातील मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..