Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 19, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना: काळीजादू करून पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून ५.५ लाख रुपयांची फसवणूक केली तसेच अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायालयाने महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२, शिर्सुफळ, आटोळेवस्ती, बारामती, पुणे) यास विविध कलमान्वये दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी, ४३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास कैद अशी शिक्षा ठोठावली.

सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात भोंदूबाबांचे पेव फुटले आहे. गुन्हेही दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. भदाणे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकार अभियोक्ता अनिल ढगे यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पारनेर पोलीस ठाण्यातील तत्कालीन उपनिरीक्षक एच. एन. उगले यांनी केला व दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीत पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पैरवी अधिकारी आर. डी. अडसूळ यांनी मदत केली.

पारनेर तालुक्यात घडलेल्या या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, महादेवनाथ बाबा याने पीडिता व तिच्या वडिलांना तो देवऋषी असून काही अडचण असल्यास, भविष्य पाहून त्याचे निवारण करतो असे भासवून घरातील लोकांचे आजारपण दूर करण्यासाठी, त्यांच्या मेंढ्या मरू न देण्यासाठी होमहवन करावा लागेल. तुमच्यावर लोकांनी करणी केली आहे.त्यासाठी विधी करावा लागेल, असे सांगून तसेच पिडीता सतत आजारी पडत असल्याने तिला बरे करण्यासाठी पूजा करावी लागेल असे आमिष दाखवून पूजा करण्यासाठी व पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पीडितेच्या वडिलांकडून ५ लाख ५० हजार रुपये स्वीकारून आर्थिक शोषण व फसवणूक केली तसेच नोव्हेंबर २०२० मध्ये पिडीतेच्या घरात कोणी नाही, असे पाहून विनयभंग केला व डिसेंबर २०२० मध्ये पिडीतेला दमदाटी करून एअरगनचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, पूजेसाठी काढलेल्या फोटोचा गैरवापर करून तिला ब्लॅकमेल करून, तू माझी पत्नी आहेस, तू माझ्या घरी नांदायला ये नाहीतर तुमच्या घरावर जादूटोणा करून, तुमचे घर उध्वस्त करून टाकेल अशी धमकी दिली

Previous Post

मिम भिम सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा पदी परविन शेख यांची नियुक्ती

Next Post

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

Next Post

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..