
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे सामाईक बांधाच्या वादातून झालेल्या मारहाणीप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी जगदीश प्रल्हाद पाटील (वय 28, रा. आसनखेडा, ता. पाचोरा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता ते शेतात कपाशी वखरण्याचे काम करत असताना सामाईक बांधावरून औत फिरवण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी सुरेश लक्ष्मण पाटील व नामदेव सुरेश पाटील (दोघे रा. आसनखेडा) यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच नामदेव सुरेश पाटील यांनी काठीने डोक्यावर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 352/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हरिष गवळी करीत आहेत.







