
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीप्रकरणी चार जणांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सुभाष पाटील (वय 34, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुशाल रमेश पाटील, देवीदास रमेश पाटील, रमेश नवल पाटील आणि रत्नाबाई रमेश पाटील (सर्व रा. नगरदेवळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2), 115(2), 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवारी (दि. 29 जुलै) सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान नगरदेवळा येथे फिर्यादीच्या घराजवळील सार्वजनिक ठिकाणी घडली. फिर्यादीनुसार, रत्नाबाई रमेश पाटील या शिवीगाळ करत असताना फिर्यादीचे मोठे भाऊ दीपक सुभाष पाटील यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर वाद वाढला.फिर्यादी गणेश पाटील व त्यांचे भाऊ अनिल सुभाष पाटील हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, आरोपी खुशाल रमेश पाटील व देवीदास रमेश पाटील यांनी लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच रमेश नवल पाटील व रत्नाबाई रमेश पाटील यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. हरीष अहिरे करीत आहेत.







