Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील वटार येथे बोगस डॉक्टर गजाआडॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 11, 2026
in क्राईम
0
चोपडा तालुक्यातील वटार येथे बोगस डॉक्टर गजाआडॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त

उपसंपादक मन्सूर तडवी
अडावद
कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी नसताना वटार (ता. चोपडा) येथे बेकायदेशीरपणे वैद्यकीय सराव करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर अडावद पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दैनिक हॅलो बातमीदार च्या कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांनी अडावद येथील आरोग्य केंद्रात लेखी तक्रार दाखल केली होती

अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना ही माहिती मिळाली होती की, वटार गावामध्ये एक इसम कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना बोगस डॉक्टर बनून ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत आहे. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम पाटील (प्रा. आ. केंद्र अडावद) आणि डॉ. दिनेश चौधरी (समुदाय आरोग्य अधिकारी, मंगरुळ) यांनी अडावद पोलिसांच्या पथकासह (पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पो.ह. भरत नाईक, पो.ह. संजय धनगर, पो.ह. शेषराव तोरे, पो.ह. किरण शिरसाठ व पंच) हे दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास वटार येथील संशयिताच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला.
छाप्या दरम्यान आरोपी अरुपकुमार अजय कुमार आढळ (वय ४१, मूळ रा. २४ परगना, पश्चिम बंगाल; सध्या रा. वटार, ता. चोपडा) हा रुग्णांवर उपचार करताना मिळून आला. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’च्या नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली असता, त्याने भिंतीवर लावलेली ‘Vital Council of Vocational and Research Training’ व ‘Nikhil Bangiya Vidyapeeth’ यांची अमान्य प्रमाणपत्रे दाखवली.
औषध व साहित्याची जप्ती:
कारवाई दरम्यान त्याच्या ताब्यातून स्टेथॉस्कोप, विविध प्रकारची ॲलोपॅथिक औषधे, इंजेक्शन्स (C-One, Gentamicin, Dexamethasone, Ranitidine इ.), सलाईन (NS 500ml), सीरेंज व इतर वैद्यकीय साहित्य जप्त करून सील करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या व स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या अरुपकुमार आढळ याच्या विरुद्ध डॉ. शुभम पाटील यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ चे कलम ३३ अन्वये गुन्हा (गु.र.क्र. १६०/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.ह. संजय धनगर हे करीत आहेत.

Previous Post

शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर!; कथित टोळ्यांना पोसणारा कोण?

Next Post

एसपी साहेब, सॅल्युट! पेटू पाहणारं नगर शहर मिनिटात थांबवलं!महापालिका आयुक्तांना भूमिका बदलावी लागणार । बहिष्काराची अन्‌‍ दर्पोक्तीची भाषा वापरणाऱ्यांवर आता कारवाई होणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..