
रावेर तालुका प्रतिनिधी – उमेश तायडे | दि. ९ ऑगस्ट २०२६
भाटखेडा, ता. रावेर येथे तडवी-भिल्ल आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आवाहनानुसार साजऱ्या होणाऱ्या या दिनानिमित्त आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले क्रांतिवीर बिरसा मुंडा, टंट्या भिल्ल आणि खाजा नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा, टंट्या भिल्ल, खाजा नाईक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोहिल हबीब तडवी होते.
यावेळी आदिवासी समाजातील पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. आरिफ सुपडू तडवी, रिहाज महंमद तडवी, रसूल खलील आणि बबलू सलीम तडवी यांनी बिरसा मुंडा, टंट्या भिल्ल व खाजा नाईक यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. बारावी उत्तीर्ण झालेल्या सिमरन तडवी आणि नफीसा तडवी या गुणवंत विद्यार्थिनींचा सरपंच सौ. सुनंदा गुलाबराव पाटील आणि युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच सौ. सुनंदा पाटील, धनंजय शिरीष चौधरी, नशीर इब्राहिम लोहारा, सलीम सरपंच कुसुंबा, पालक हबीब अल्लाबक्ष, रि. मुख्याध्यापक रशीद सुभान तडवी, रि. एस.पी. उपअधीक्षक डॉ. सोहिल तडवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचे विविधांगी दर्शन घडविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तडवी समाजातील बांधव, महिला, युवक तसेच विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी आदिवासी उत्सव समिती भाटखेडाचे अध्यक्ष नशीर वस्ताद गुलशेर तडवी, बबिता मॅडम, अखिल भारतीय अध्यक्ष यासीन तडवी, सर्कल खानापूर बिस्मिल्ला तडवी, मलकापूरचे रमजान तडवी, फिरोज तडवी, आदिवासी लोहारा येथील महेमुद, कवी उटखेडा, सुपडू तडवी, अकबर तडवी, नजीर तडवी, सलीम तडवी, समीर तडवी, रमजान रशीद, माजी नबाब मेंबर, सुलेमान तडवी, गुलाब पाटील, काशीनाथ मेंबर, राहुल मेंबर, सौ. मीना मेंबर, इस्माईल तडवी, इतबार तडवी, रहेमान तडवी, मासुम दादा वाताहार तसेच भाटखेडा गावातील पंच कमिटीचे सदस्य दिलीप तडवी, सुलेमान तडवी, शाहमद तडवी, अल्ताफ तडवी, इम्तियाज तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी उत्सव समिती भाटखेडा अध्यक्ष नशीर वस्ताद यांनी केले, तर रफिक मेंबर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहार, चहा व पोहे यांचे वाटप करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने भाटखेडा येथे पारंपरिक संस्कृती, सामाजिक एकोपा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा उपक्रम उत्साहात पार पडला.







