Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

निंभोरा शिवारातील ६६ हजारांच्या गायी चोरीचा छडा; चार आरोपी अटकेत

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 21, 2026
in क्राईम
0
निंभोरा शिवारातील ६६ हजारांच्या गायी चोरीचा छडा; चार आरोपी अटकेत

रावेर प्रतिनिधी उमेश तायडे

निंभोरा : निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) येथील सबस्टेशनजवळील वाड्यावरून दोन शेतकऱ्यांच्या चार गायी चोरीला गेल्याची घटना २९ जुलै २०२६ रोजी रात्री घडली होती. चोरीला गेलेल्या गायींची एकूण किंमत ६६ हजार रुपये होती. याप्रकरणी निंभोरा पोलिसांनी तपास करून चार आरोपींना अटक केली आहे.
निंभोरा बुद्रुक येथील लक्ष्मण गोविंदा बोढे यांच्या दोन गायी, तसेच शेजारील वाड्यातील शेतकरी सुपडू विश्वनाथ नेमाडे यांच्या दोन गायी चोरीला गेल्या होत्या. बोढे यांच्या दोन गायींची किंमत २२ हजार रुपये, तर नेमाडे यांच्या दोन गायींची किंमत ४४ हजार रुपये होती. गायींचा शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. १७२/२०२६, BNS कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीदार, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला.
तपासादरम्यान पोलिसांनी हयात शेख मासून मन्यार (२५, रा. चिनावल), शेख आवेश शेख एजाज खान (२०, रा. सावदा), शेख राजीद शेख शरीफ (२३, रा. रसलपूर) आणि शेख नासीर शेख चांद (४५, रा. वरणगाव) या चार आरोपींना अटक केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ अविनाश पाटील आणि पोकॉ किरण कोळी यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास निंभोरा पोलीस करत आहेत

Previous Post

KYCच्या तांत्रिक अडथळ्यामुळे लाडक्या बहिणींची आर्थिक कोंडी वेबसाईट सुरू करून रखडलेले हप्ते तातडीने देण्याची मागणी; पात्र महिलांचा संताप

Next Post

प्रताप पाळंदे यांचे निधन

Next Post
प्रताप पाळंदे यांचे निधन

प्रताप पाळंदे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..