Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राहुरी तहसील कार्यालयामधील वरिष्ठ अधिकारी मॅडम कडून विनाकारण अन्याय होत असल्याचा आरोप श्री .दामोदर तुपे यांनी केला .

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 15, 2026
in सामाजिक
0
राहुरी तहसील कार्यालयामधील वरिष्ठ अधिकारी मॅडम कडून विनाकारण अन्याय होत असल्याचा आरोप श्री .दामोदर तुपे यांनी केला .

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील करजगाव येथे कायमस्वरूपी राहणारे दामोदर बाबुराव तुपे वय वर्ष 80 यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझे गाव करजगाव तालुका राहुरी हे असून माझ्या राहत्या गावी माझ्या पोटापुरती शेतजमीन आहे माझ्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालतो व आज पर्यंत चालत आहे सदरच्या जमिनीचा गट नंबर 66 असा आहे आमच्या गावातील क्षेत्रधारक (मूळचे कान्हेगाव तालुका श्रीरामपूर )श्री .विशाल गीताराम खरात यांच्या शेतीचा गट नंबर 64 / 2असा आहे त्यांना त्यांच्या शेतातून ये जा करण्यास रस्ता असून देखील त्यांनी मा .तहसीलदार साहेब राहुरी यांच्याकडे शेतात ये जा करण्यासाठी रस्त्याची मागणी अर्ज केला होता त्या अनुषंगाने मा .तहसीलदार साहेबांनी आम्हास नोटीसद्वारे आम्ही सदर रस्त्याची पाहणी करण्यास येणार असल्याचे कळविले होते .
आम्ही त्यांची वाट पाहिली असता सायंकाळी सहा वाजता राहुरीच्या नायब तहसीलदार मॅडम आपल्या पथकासह आल्या त्या आल्या असता आम्ही त्यांना सर्व हाकिकत सांगितली आणि त्यानंतर विचारणा केली की विशाल खरात यांना शेतात ये जा करण्यास रस्ता नाही तर मग त्यांनी ह्या शेतीची मशागत कशी काय केली व हे पीक उभे कच्चे राहिले मी मॅडमला खरात यांना शेतात येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे तो दाखवला नायब तहसीलदार मॅडम यांचे म्हणणे असे आले की त्यांना आता नवीन रस्त्याची गरज आहे खरात यांच्या बांधाच्या अगदी जवळच श्री .बाळासाहेब विश्वनाथ कोतकर दत्तात्रय विश्वनाथ कोतकर व अशोक विश्वनाथ कोतकर यांची जमीन आहे आणि तिथूनच त्यांना नवीन रस्ता अगदी 100 फूट अंतरावर असून देखील त्या जवळच्या गटामधून रस्ता न देता 500 फूट लांबून नवीन रस्ता कसा काय देणार तरी खरात कोतकर व नायक तहसीलदार मॅडम यांनी संगम मत करून आमच्या शेतातून श्री .खरात यांना रस्ता दिला आहे
या सर्व घटनेनंतर मी राहुरी येथील नायब तहसीलदार मॅडम यांना विचारणा करण्यासाठी गेलो असता सदर मॅडमनी मला चक्क असे सांगितले की तुमची फाईल कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे तुम्ही पुन्हा आमच्याकडे परत येऊ नका निष्करण आपणास हेलपाटे पडतील अशा प्रकारे नायब तहसीलदार मॅडमनी कोणत्या आधारे निकाल दिला आहे हे अद्यापही मॅडमनी आम्हाला स्पष्ट सांगितले नाही खरात याचा गट नंबर 64 / 1आणि 64 / 2आहे तर आमचा गट नंबर 66 आणि खरात यांच्या जवळचा गट नंबर 67 असताना देखील एवढ्या कसा काय रस्ता दिला आणि कोणत्या नियमाच्या व कायद्याच्या आधारे दिला हे नायब तहसीलदार मॅडमनी आम्हा सांगावे .
मा .नायब तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला दिलेला निकाल हा निव्वळ संगणमत करून आणि पैसे घेऊन दिला असल्याचा आरोप दामोदर तुपे यांनी निवेदनात केला आहे मा .नायब तहसीलदार मॅडम यांनी दिलेला निकाल आम्हास मान्य नसून आणि म्हणूनच त्या निकालाच्या विरोधात मी व माझे 14 / 9 / 2026 पासून राहुरी तहसील कार्यालय समोर उपोषणास बसणार आहे माझी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री .देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण मा .अहिल्यानगरचचे जिल्हाधिकारी साहेबांना आदेश देऊन सदर नायब तहसीलदार मॅडम व संबंधित शेत जमिनीची सखोल चौकशी करावी सदर नायब तहसीलदार मॅडमनी माझी व माझ्या कुटुंबीयाची मानसिक आणि आर्थिक नुकसान केले असून सदर नुकसानी बद्दल मा .नायब तहसीलदार मॅडम यांच्याकडून माझ्या कुटुंबीयांना रक्कम पाच लाख मिळावे ही मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती तसेच मा .जिल्हाधिकारी साहेबांना आपण आदेश देऊन करजगाव येथे येऊन शहानिशा करावी त्याचबरोबर आम्हाला राहुरी तहसील मधून होणारा त्रास थांबवावा असे निवेदनात नमूद केले आहे उपोषणास दामोदर तुपे गोवर्धन तुपे भागवत तुपे मेजर भागवत तुपे सौ .संगीता तुपे लहानबाई तुपे नामदेव तुपे लक्ष्मण तुपे आदी उपोषणास बसले आहेत
त्यांना पाठिंबा म्हणून करजगाव गावामध्ये नागरिक त्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत आहेत .

Previous Post

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला

Next Post

आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे उपोषण सुरूच; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ

Next Post
आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे उपोषण सुरूच; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ

आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे उपोषण सुरूच; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..