Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 16, 2026
in क्राईम, राजकीय
0
खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा

तालुका प्रतिनिधी:-

जळगाव, दि. १६ सप्टेंबर : भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर शाहाबाद येथील टोल गेटवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष, स्वतंत्र व कालबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदया यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच हल्ल्यामागे कोणतेही पूर्वनियोजित षड्यंत्र किंवा सूत्रधार असल्यास त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन त्यांच्या सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्याचे गांभीर्य लक्षात घेता Z+ सुरक्षा प्रदान करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेला महत्त्व असून, अशा घटनांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने महाराष्ट्रभर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, संदीप सपकाळे, जावेद शेख, मुबारक तडवी, विद्यासागर खरात, अल्केश मोरे, राहुल जयकर, सुपडू सदानशिव, जुम्मा तडवी, विनोद सोनवणे, अनिल मोरे, शकील शेख, वैशाली पाटील, संगीता दया, रेखा पाटील, शारदा तायडे, जय सपकाळे, चंद्रमणी मोरे, विशाल वाघमारे आदी उपस्थित होते.

Previous Post

अहिल्यानगर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहल ताई दिवे यांची निवड

Next Post

राहुरी फॅक्टरीतील पादचारी उड्डाण पुलाच्या कामाला अखेर सापडला मुहूर्त आप्पासाहेब ढूस यांच्याकडून आ .प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..