
राहुरी तालुका प्रतिनिधी -( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी शिक्षक अरुण कराड सर यांची नात व अतुल कराड यांची कन्या तेजल अतुल कराड ही पुढील उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्क अमेरिका येथे रवाना झाली आहे तिच्या या शैक्षणिक वाटचालीबद्दल राहुरी फॅक्टरी परिसरातून तिच्यावर अभिनंदननाचा वर्षाव होत असून विविध स्तरातून तिला पुढील घेत असलेल्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत .
तेजल कराड हिने राहुरी फॅक्टरी येथे असणाऱ्या डीपॉल स्कूलमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर तिने पुढील शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात येथे व नंतर मणिपाल विद्यापीठ कर्नाटक येथे शिक्षण घेतले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत तिने आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठ ( आय व्ही लिंग ) येथे एम एस ( कलायमॅट ) हे शिक्षण घेण्यासाठी तेजल कराड ही अमेरिकेला रवाना झाली आहे .
तेजलच्या या यशामुळे कराड कुटुंबीयांसह राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मेहनत जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने गाठलेले हे यश राहुरी फॅक्टरी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे .
तेजलच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिचे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार तसेच राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी तिला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .







