
रावेर तालुका प्रतिनिधी – उमेश तायडे
रावेर : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय शामराव अवसरमल, तर रावेर तालुका अध्यक्षपदी रेंभोटा येथील पत्रकार प्रशांत दिलीप गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश्वर दुसाने, खानदेश विभागीय अध्यक्ष समाधान मैराळे तसेच उत्तर महाराष्ट्र राज्य संघटक यांच्या सूचनेनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. पाचोरा येथे आयोजित पत्रकार संघाच्या अधिवेशनात राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी विजय अवसरमल आणि प्रशांत गाढे यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
या वेळी उपस्थित पत्रकारांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेचे कार्य अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







