Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

स्व. अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ निंभोऱ्यात ‘माणुसकीची दिवाळी संवेदनांची दिवाळी’ उपक्रमाचे आयोजन!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 5, 2026
in राजकीय
0
स्व. अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ निंभोऱ्यात ‘माणुसकीची दिवाळी संवेदनांची दिवाळी’ उपक्रमाचे आयोजन!

राष्ट्रवादी युवती काँग्रेस, रावेर लोकसभा व निंभोरा ग्रामसेवा समितीचा पुढाकार; विविध मान्यवरांची उपस्थिती
निंभोरा (ता. रावेर) : प्रतिनिधी उमेश तायडे -लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत ‘माणुसकीची दिवाळी – संवेदनांची दिवाळी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस, रावेर लोकसभा आणि निंभोरा ग्रामसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दिवाळी हा सण केवळ रोषणाई, फराळ आणि आनंदोत्सवापुरता मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांपर्यंत आनंद पोहोचविणारा ठरावा, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक संवेदना, माणुसकी आणि आपुलकीचा संदेश या माध्यमातून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री मा. सौ. निर्मलाताई तुषार नवले, माजी मंत्री तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. आ. अनिलदादा पाटील, तसेच जिल्हाध्यक्ष व माजी आमदार मा. संजय पवार उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय वितरण हस्ते म्हणून मा. आ. नंदकुमार महाजन, कार्यक्रमाध्यक्ष म्हणून मा. आ. अमोलभाऊ जावळे, तर उद्घाटक म्हणून मा. उमेशभाऊ नेमाडे यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभाताई शिंदे, मनीषाताई तुपे, जयश्रीताई पाटील, वैशालीताई अमित पाटील, डॉ. केतकीताई पाटील, राजेशभाऊ वानखेडे, रविंद्र नाना पाटील, आफिक शेख दादा, कुर्बान शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार, सायंकाळी ७ वाजता आठवडे बाजार चौक, निंभोरा, ता. रावेर येथे आयोजित करण्यात आल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद आहे. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी कु. भाग्यश्री विवेक ठाकरे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस) आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक एकोपा, माणुसकी आणि संवेदनशीलतेचा जागर करण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Next Post

विदगाव–किनगाव रस्त्यावर विकासाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची कत्तल; रस्ता रुंदावणार, पण निसर्गाची भरपाई कोण करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विदगाव–किनगाव रस्त्यावर विकासाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची कत्तल; रस्ता रुंदावणार, पण निसर्गाची भरपाई कोण करणार?

विदगाव–किनगाव रस्त्यावर विकासाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची कत्तल; रस्ता रुंदावणार, पण निसर्गाची भरपाई कोण करणार?

November 5, 2026
स्व. अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ निंभोऱ्यात ‘माणुसकीची दिवाळी संवेदनांची दिवाळी’ उपक्रमाचे आयोजन!

स्व. अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ निंभोऱ्यात ‘माणुसकीची दिवाळी संवेदनांची दिवाळी’ उपक्रमाचे आयोजन!

November 5, 2026
निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..