Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल…पालकमंत्र्यांचे हस्ते सरपंच दिपक पाटील यांचा सत्कार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 29, 2025
in सामाजिक
0

*गावासाठी गौरवास्पद बाब
*गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात प्रभावीपणे वृक्षारोपण व संगोपन या क्षेत्रात साकळी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साकळी ग्रामपंचायतचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.व्यापक वृक्षारोपण उपक्रमात लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करून तालुक्यात आदर्श निर्माण केलेला असून या कामाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जळगाव येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि.२२ नोव्हें.२०२५ रोजी आयोजित केलेल्या सन्मान सोहळा कार्यक्रमात राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दिपक पाटील व ग्राम रोजगार सेवक विशाल पाटील यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
साकळी गावात सरकारी दवाखाना,प्राथमिक व माध्यमिक शाळा,देवस्थान परिसर,सार्वजनिक ठिकाणे,स्मशानभूमी,शेतशिवार रस्ते-बांध यासह गावात ठिकठिकाणी सरपंच दिपक पाटील,उपसरपंच नूर बी तस्लीम खान,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्राम रोजगार सेवक,ग्रामंस्थ यांच्या पुढाकाराने वर्ष – दोन वर्ष वयाच्या मोठ्या वृक्षांचे व्यापक असे वृक्षारोपण करण्यात आले आहे.वृक्षांची केवळ लागवड न करता त्यांच्या संगोपनावर विशेष भर देण्यात येत असते.त्यामुळेच या उपक्रमाला जिल्हास्तरावर विशेष बहुमान मिळाला आहे.गावातही वृक्षारोपण मोहिमेला नागरिकांनी वेळोवेळी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हा गावातील व्यापक वृक्षारोपण मोहिमेमुळे गाव- परिसराचे भविष्यातील पर्यावरण संतुलन राखण्यास खूप मोठी मदत होणार आहे.सदर वृक्षारोपण मोहिमेचा जिल्हास्तरावर सन्मान झाल्याने साकळी गावाच्या गौरवात आणखी एक भर पडली आहे.

Previous Post

यावल नगरपरिषद निवडणूक – 2 डिसेंबरला मतदारांचा निर्णायक कोप!माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास जनता सज्ज!

Next Post

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली

Next Post

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..