Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

“४ मे ला ठरणार राहुरीचा राजा! आज मतमोजणीत कोणाची लागणार लॉटरी?”

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 4, 2026
in राजकीय
0


अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून आज (ता. 4) सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएम (EVM) मतमोजणीला सुरुवात होईल, तर पहिला कल सुमारे साडेनऊ वाजता समोर येण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट चित्र दिसणार आहे.

मतमोजणीसाठी टपाली मतांसाठी 2 टेबल, ईटीपीबीएससाठी 4 टेबल आणि ईव्हीएमसाठी तब्बल 14 टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 27 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर निवडणूक अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रात कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून ओळखपत्राशिवाय प्रवेश बंद आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच पेन आणण्यासही मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रतिनिधींना आवश्यक साहित्य प्रशासनाकडूनच पुरवले जाणार आहे.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे उमेदवार गोविंद मोकाटे आणि भाजपचे अक्षय कर्डिले यांच्यात मुख्य लढत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदार होते. त्यापैकी 1 लाख 86 हजार 405 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 1 लाख 1 हजार 991 पुरुष आणि 84 हजार 414 महिला मतदारांचा सहभाग होता.

आता काही तासांतच राहुरीच्या राजकारणाचा नवा चेहरा समोर येणार असून, कोणाचा विजयाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Previous Post

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

Next Post

रावेर तालुक्यात भरदिवसा वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल प्रशासन झोपेत की संगनमत?

Next Post

रावेर तालुक्यात भरदिवसा वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल प्रशासन झोपेत की संगनमत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..