Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 8, 2026
in क्राईम
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि बीड जिल्ह्यातील केज येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दोन्ही घटनांमधील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिंदे गट शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख नंदा निकम यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, नसरापूर (जि. पुणे) येथे ४ वर्षीय चिमुकल्या मुलीवर भीमराव कांबळे या नराधमाने अत्याचार करून तिच्यावर दगडाने वार करत हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचे प्रेत शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून अशा विकृत प्रवृत्ती दयेच्या लायकीच्या नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

तसेच बीड जिल्ह्यातील केज येथेही ३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या दोन्ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाण्या असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

या प्रकरणांतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने खटला चालवण्यात यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती :
निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख नंदा निकम, उपजिल्हा संघटक मनीषा पाटील, तालुका प्रमुख वर्षा तल्लारे, मीनाक्षी गणकर, भाग्यश्री पाटील, ललिता आंबोरे, दुर्गावती यादव, ज्योती तायडे, अमिता निकम, रोहिणी तायडे, रूपाली चौधरी, मनीषा खडसे, युवा सेना जिल्हाप्रमुख पवन भोळे, उपतालुका प्रमुख सुरेश कोल्हे, युवासेना अल्पसंख्यांक जिल्हा उपप्रमुख हमीद शेख, अनिकेत जैन, सागर भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज

Next Post

भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

Next Post

भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..