Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर तालुक्यात सुकी नदीपात्राची खुलेआम लूट; वाळू-माती माफियांचा धुमाकूळ, तहसीलदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 12, 2026
in क्राईम
0

प्रतिनिधी : राहुल जयकर

रावेर तालुक्यातील विविध भागांतील सुकी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू, माती व रेतीची विनापरवानगी वाहतूक भरदिवसा सुरू असून, यामुळे पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दैनिक हॅलो बातमीदारणे वेब पोर्टलवर प्रत्यक्ष व्हिडिओ सह बातमी प्रसिद्ध करूनही रावेर तहसील प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू-मातीची भरदिवसा सर्रास वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट दिसून आले. इतकेच नव्हे तर दसनूर तलाठी कार्यालयापासून अवघ्या ५० मीटर अंतराच्या आतूनही खुलेआम वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अवैध वाहतुकीमुळे परिसरात धुळीचे प्रमाण वाढून नागरिकांना श्वसनाचे विकार, खोकला, दमा, डोळ्यांची जळजळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, एवढा प्रकार उघड होऊनही रावेर तहसीलदार व महसूल विभागाकडून प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी आता थेट प्रश्न उपस्थित केला आहे की,
“तहसीलदार व महसूल प्रशासन वाळू माफियावर कारवाई करणार का? आणि कारवाईसाठी दिरंगाई का?”

“डोळे झाकण्याचे नाटक की संगनमत?” नागरिकांचा संतप्त सवाल

सध्या परिस्थिती पाहता महसूल विभागाने डोळे झाकल्याचे नाटक केले आहे की काय? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. नदीपात्राची लूट सुरू असताना प्रशासनाकडून होणारी शांतता ही संशयास्पद असून, या प्रकरणामागे “काहीतरी गोडबंगाल आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

नागरिकांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, वाळू माफियांचे राजकीय संबंध असल्यामुळेच कारवाई टाळली जात आहे का ? तसेच वाळू माफियांचे आर्थिक हितसंबंध तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याशी असल्यामुळे कारवाई होत नाहीये का ? असा सवालही आता जोर धरू लागला आहे.

अवैध उत्खननामुळे नदीपात्राची नैसर्गिक रचना नष्ट होत असून, भविष्यात पूरस्थिती, भूजल पातळी घट, शेती नुकसान व पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र महसूल विभागाकडून केवळ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

या प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाई करून जेसीबी, ट्रॅक्टर जप्त करणे, संबंधितांवर गुन्हे दाखल करणे, तसेच दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर लवकरच ठोस कारवाई झाली नाही, तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता व पर्यावरण संवर्धन विकास समिती रावेर तालुका प्रमुख जयेश बिरपण यांनी दिला आहे.

दरम्यान, आमच्या प्रतिनिधींनी मंडल अधिकारी वानखेडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
“ही माती शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी आमदार महोदय यांनी सांगितली आहे, त्यामुळे आम्ही कारवाई करत नाही.”

या उत्तरामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “आमदारांच्या नावाखाली नदीपात्रातून माती उपसा व वाहतूक करण्यास परवानगी आहे का?” असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीपात्रातील माती, वाळू व रेतीचा उपसा हा पर्यावरणीय कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट असतानाही, जर राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन कारवाई टाळत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

Previous Post

यावल तालुक्यात अवैध पन्नी दारूचा सुळसुळाट ; उत्पादन शुल्क विभाग मात्र ‘हप्ते वसुलीत’ व्यस्त ?तरुणाई व्यसनाधीन, संसार उद्ध्वस्त… महिलांचा संताप अनावर

Next Post

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

Next Post

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..