Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळी गावात गावठी पन्नी दारूविरोधात महिलांचा एल्गार१०० हून अधिक महिलांच्या सह्यांसह सरपंच दिपक नागो पाटील यांना निवेदन“अवैध दारू बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन” – ग्रामस्थांचा इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 16, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी गावात सुरू असलेल्या अवैध गावठी पन्नी दारू विक्रीविरोधात आता महिलांनीच थेट रणशिंग फुंकले असून, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपक नागो पाटील यांना १०० हून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
गावात खुलेआम सुरू असलेल्या गावठी पन्नी दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे. विशेषतः युवक व्यसनाधीन होत असून महिलांना घरगुती त्रास, भांडणे आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याची संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली.
महिलांनी दिलेल्या निवेदनात गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गावात पोलीस गस्त वाढवण्यात यावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. “गाव उद्ध्वस्त करणारा हा अवैध धंदा बंद झाला नाही तर महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
साकळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपक नागो पाटील यांना हे निवेदन देताना महिलांची मोठी उपस्थिती होती. निवेदनावर १०० पेक्षा अधिक महिलांच्या सह्या असल्यामुळे गावातील संताप किती तीव्र आहे, हे स्पष्टपणे दिसून आले.
दरम्यान, गावातील काही दारू विक्रेते कोणाच्याही भीतीशिवाय खुलेआम व्यवसाय करत असल्याची चर्चा गावात सुरू असून, अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “अखेर या अवैध धंद्यांना संरक्षण कोण देत आहे?” असा सवाल आता ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत.
महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे साकळी गावातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा अधिकच तापला असून, आता ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

यावल पाटबंधारे विभागात अधिकारीच गायब? अभियंता रोटे यांच्या कायम गैरहजेरीमुळे नागरिक संतप्त!

Next Post

आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य चा वार्षिक मेळावा यावल येथे उत्साहात संपन्न झाला

Next Post

आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य चा वार्षिक मेळावा यावल येथे उत्साहात संपन्न झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..