Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 5, 2026
in देश-विदेश
0
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

अहिल्या नगर(प्रशांत बाफना)
वयोवृद्धापासून ते चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागला आहे. मोबाइलचा अतिवापर होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाइलमध्ये अडकली आहे. तसेच लहान मुलेही मोठ्या प्रमाणात मोबाइलच्या आहारी जात असल्याने दृष्टी कमी होण्याचा धोका वाढत आहे. गेल्या काही वर्षात संवादाचे माध्यम असल्याने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे.सध्या घरोघरी टीव्ही, मोबाइल,संगणक ,लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामकाजासाठी वापरतात, नवीन पिढी तर यात पुढे आहे. सुरुवातीला सहज दिलेला मुलांच्या हातातला मोबाइल तर आता सवईचा भाग झाला आहे. यामुळे डोळ्यांच्या अडचणी वाढत आहेत. नेत्र तज्ज्ञांकडे जाणारे बहुतांश नागरिक आपल्या मुलांची दृष्टी कमी झाल्यामुळे घेऊन जातात. लहान मुलांना रडू नये म्हणून मोबाईल हातात देऊन शांत करण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र यामुळे डोळ्यांचा धोका निर्माण होण्याची शंका आहे.काही मुले मोबाइलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. स्मार्ट फोनमध्ये नवनवीन बदल झाले असून अनेक गेम यामध्ये समाविष्ट झालेले आहेत.यातील तरुणांचा कर्दनकाळ ठरलेल्या अनेक गेमच्या विळख्यात अनेक मुले आणि नागरिक सापडले आहेत. मोबाईलवर लुडोसारख्या अनेक गेममध्ये ते गुंतून राहतात, त्यामुळे जवळ असूनसुद्धा जवळच्याला बोलायला वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.शहरी भागात अगोदरपासूनच मुलांच्या हातात मोबाईल होता, मात्र कोरोना साथीत सगळीकडे ऑनलाइन शिक्षण चालू झाले, तेव्हापासून ग्रामीण भागातही मोबाइल मुलांच्या हातात जास्त प्रमाणात आले आहेत. त्यामुळे आता सतत मोबाइल मुलांना हातात ठेवावा वाटत असल्याचे चित्र आहे. मोबाईलमुळे लहान मुलांच्या दृष्टीवर दुष्पपरिणाम होऊन नजर कमी होते. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना मोबाईल देऊ नये.

Previous Post

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

Next Post
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..