Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्रीगोंदा शहरात मावा, गुटखा व नशीले पदार्थांची विक्री वाढली; लहान वयातील मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात…

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 18, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
शहरात खुलेआम मावा, गुटखा तसेच विविध नशीले पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुले आणि युवक या पदार्थांच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही टपऱ्या, पानटपऱ्या आणि हॉटेल परिसरात नियमांना धाब्यावर बसवून विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातही सहजपणे गुटखा, मावा आणि अन्य नशीले पदार्थ उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. कमी वयातच व्यसन लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि भविष्यात गंभीर परिणाम होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने शहरात विशेष मोहीम राबवून अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डॉक्टरांच्या मते, मावा, गुटखा आणि नशीले पदार्थांचे सेवन केल्याने तोंडाचे आजार, कर्करोग, मानसिक अस्थिरता तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील वाढत्या व्यसनाधीनतेमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे

Previous Post

यावल तालुक्यातील हरिपुरा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाची महापंचायत सभा संपन्न

Next Post

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

Next Post

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..