Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 19, 2026
in आरोग्य
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेले स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार पडले. ग्रामीण भागातील महिलांनी या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सुरक्षित आरोग्य सेवांवर विश्वास व्यक्त केला.
महिलांच्या आरोग्य संवर्धनासोबत कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सातव्या शिबिरात अनेक महिलांवर अत्याधुनिक व सुरक्षित पद्धतीने बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिराचे नियोजन व मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिनजी दरंदले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरवसे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिवराज गुंजाळ यांनी शस्त्रक्रिया पार पाडल्या. विशेष म्हणजे घोडेगाव येथून डॉ. शिवराज गुंजाळ यांनी उपस्थित राहून महिलांना सेवा दिली. शिबिरादरम्यान महिलांची आवश्यक वैद्यकीय तपासणी, समुपदेशन तसेच उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते.
यावेळी माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिनजी दरंदले यांनी सांगितले की, “उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सातही शिबिरांमध्ये आतापर्यंत 154 हून अधिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. महिलांमध्ये कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता वाढत असून सुरक्षित आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी महिलांचा सहभाग वाढत आहे.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयीन अधीक्षक आदिनाथ भोईटे, सह अधिसेविका श्रीमती हेमलता वराडे, परिसेविका श्रीमती शैला खाडे, अधिपरिचारिका श्रीमती स्वप्ना सोनवणे, श्रीमती तसलीमा शेख, श्रीमती सुनिता खेडकर, श्रीमती वैष्णवी खनपीठ, श्रीमती आरती डोंगरे, श्रीमती मीना जगदाळे, श्रीमती जयश्री अंतरकर, श्रीमती कालींदा पवार, श्रीमती सुप्रभा शिंदे, सह अधिपरीचारिका श्रीमती पूजा जाधव, सुपरवायझर उत्तम गिरी तसेच कक्षसेवक श्री संजय ससाने, श्री अनिरुद्ध बैरागी व श्री अल्ताफ शेख यांनी विशेष सहकार्य केले.
“संपूर्ण स्टाफच्या उत्कृष्ट समन्वयामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले,” असे गौरवोद्गार डॉ. सचिनजी दरंदले यांनी काढले

Previous Post

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

Next Post

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

Next Post

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..