Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..अंधाराचा फायदा घेत १ जण फरार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 25, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगरु (प्रशांत बाफना):राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोड परिसरात डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पोलिसांनी गुहा गाव परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार, चाकू,लोखंडी कटावणी आणि डिझेलसह एकूण २,१५,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत टोळीतील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.गुप्त बातमीदाराने दिली माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पाहिजे असलेल्या व फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक १८ मे २०२६ च्या रात्री राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.या दरम्यान, कोल्हार ते राहुरी रोडने एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पद रित्या फिरत असून, त्यामधील इसम डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पथकाला मिळाली.माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोडवर शोधमोहीम सुरू केली. गुहा गाव परिसरात बातमीतील संशयास्पद कार कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी तात्काळ कार अडवून त्यातील इसमांना ताब्यात घेतले.

तीन आरोपी अटकेत, एक फरार..पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली

१) करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके (वय २२, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी)

२) सनि उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार (वय १९, रा. सावळीविहीर, ता. राहाता)

३) जितेंद्र रोहिदास वाघमारे (वय ३३, रा. पिंपळस, ता. राहाता)

तसेच, पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत पळून गेलेल्या त्यांच्या चौथ्या साथीदाराचे नाव निलेश मोकळ (रा. सावळीविहीर, ता. राहाता) असल्याचे अटकेतील आरोपींनी कबूल केले

Previous Post

जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकास निधीवर डल्ला?सत्ताधारी सरपंच–ग्रामसेवकांच्या संगनमतातून दलित हक्कांवर घाला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक“दलित वस्त्यांचा निधी इतर भागात वळवणाऱ्यांवर नावानिशी गुन्हे दाखल करा”  शमिभा पाटील

Next Post

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

Next Post

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..