Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या – आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 26, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी पूर्वीप्रमाणे किमान ८ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रावेर मतदारसंघामध्ये केळी हे मुख्य पीक असून सध्या केळी पीक कापणीच्या टप्प्यावर आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उन्हाळी लागवड देखील करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सुरळीत व पुरेसा विजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार जावळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या कृषी पंपांसाठी मिळणारा वीजपुरवठा पूर्वीच्या ८ तासांवरून कमी करून ६ तास करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाढत्या तापमानामुळे केळी पिकाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कृषी पंपांसाठी तात्काळ पूर्वीप्रमाणे ८ तासांचा नियमित व अखंडित विजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.

Previous Post

देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक सण 2002 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

Next Post

केडगाव दगडफेक प्रकरण: दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

Next Post

केडगाव दगडफेक प्रकरण: दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..