Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

केडगाव दगडफेक प्रकरण: दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 26, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना, 26 मे 2026: केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व 600 आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचाही समावेश आहे.

एप्रिल 2018 मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता.

सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम 308 लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली होती. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते.

या कारवाईनंतर आमदार अनिलभैय्या राठोड यांनी म्हटले होते की केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती. शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, 2020 मध्ये कोरोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले. न्यायालयात खटला सुरू होता. आता निकाल आला असून सर्वांची सुटका झाली आहे

Previous Post

रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या – आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Next Post

बीड पुन्हा हादरलं: संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती? दोरीने बांधून अमानुष मारहाण; गंभीर दुखापतीने एकाचा मृत्यू

Next Post

बीड पुन्हा हादरलं: संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती? दोरीने बांधून अमानुष मारहाण; गंभीर दुखापतीने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..