Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 31, 2026
in क्राईम
0

धनंजय देशमुख यांच्यावर एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

, बीड/प्रशांत बाफना: मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला बंदूक लावून आपल्याला जीवे मारण्याच्या हेतूने धनंजय देशमुखने प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं असून या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत भावाच्या न्यायासाठी रान उठवले होते. आपल्या भावाची झालेली निर्घृण हत्या माणुसकीला काळिमा फसणारी असून यातील दोषीवर कठोर कारवाई व्हावी आणि आरोपीच्या संबंधित गँगवर अनेक धक्कादायक आरोप धनंजय देशमुखच्या वतीने सतत सुरू होते. मात्र आता धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

रवीराज साबळेंचाही उल्लेख

ग्रामीण पोलिसांकडे समाधान खिंडकर (वय-३०, व्यवसाय मजुरी रा. बेलवाडी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, “मी आणि माझे मित्र दीपक रसाळ, योगेश मनेरी व दीपकच्या आणखी एका मित्रासोबत मोटारसायकलवर बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी येथे जेवणासाठी गेलो होतो. यावेळी रीलस्टर रवीराज साबळे हे देखील त्यांच्यासोबत हॉटेल शेतकरी राजा येथे जेवण करण्यासाठी आले होते. मी माझ्या मोबाईलवरून रवीराज साबळे यांना इन्स्टाग्रामवरील लाइव्ह दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने माझ्या हातातून मोबाईल घेतला. तेव्हा तुम्ही माझा फोन का घेतला असं मी म्हणताच धनंजय देशमुख हे पाठीमागून पळत आले आणि मला म्हणाले की, तू विनाकारण आमच्या वाकड्यात घुसू नकोस, माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी चालता-चालता तुला संपवून टाकीन. त्यानंतर देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेचे पिस्तूल काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्याला लावले आणि मला म्हणाले की, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर मला शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला,” असं समाधान खिंडकर याने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणात बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात 192/2026,कलम 109,352,351,(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत

Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

Next Post

बीड हादरलं: पैशाचा वादाचा रक्तरंजीत शेवट, मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून केला मित्राचा खून ; अपघाताच्या बनावासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

Next Post

बीड हादरलं: पैशाचा वादाचा रक्तरंजीत शेवट, मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून केला मित्राचा खून ; अपघाताच्या बनावासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..