
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना : शेवगाव पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींना शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. आरोपींना कारागृहात पाठविण्यापूर्वी त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते.
आरोपींना भेटण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. अनेकांनी आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. काही महिला व ज्येष्ठ नागरिक भावनिक झाल्याचे चित्र पोलीस ठाण्याच्या परिसरात पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ वातावरण भावनिक बनले होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेवगाव पोलिसांनी पोलीस ठाणे परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. आरोपींना पोलिसांच्या वाहनातून सुरक्षा व्यवस्थेसह नाशिक कारागृहात पाठविण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.
२६ आरोपींच्या एकाच वेळी झालेल्या रवानगीमुळे शेवगाव शहरात दिवसभर या घटनेची चर्चा सुरू हो







