Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

गारखेड्यात खळबळ! जमिनीच्या वादातून काकाची हत्या; सख्खा पुतण्या जेरबंद

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 22, 2026
in क्राईम
0
गारखेड्यात खळबळ! जमिनीच्या वादातून काकाची हत्या; सख्खा पुतण्या जेरबंद

रावेर (आदित्य गजरे विशेष प्रतिनिधी )

रावेर तालुक्यातील गारखेडा गावात जमिनीच्या वादाने रक्तरंजित वळण घेत सख्ख्या पुतण्याने काकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह नाल्याजवळ टाकून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रावेर पोलिसांनी अत्यंत वेगवान, वैज्ञानिक आणि कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या काही तासांत संपूर्ण कटाचा पर्दाफाश करून आरोपीला जेरबंद केले.दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह नाल्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान मृताच्या डोक्यावर गंभीर दुखापत आढळल्याने अपघाताऐवजी घातपाताचा संशय बळावला. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तपासाची सूत्रे हाती घेताच पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला वेग दिला.
तपासादरम्यान मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले.दि. २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर दुखापतीमुळे रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकण्यात आला, जेणेकरून हा अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल.मात्र रावेर पोलिसांनी घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा बारकाईने तपासत संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आणला. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दि. २२ जुलै २०२६ रोजी रात्री आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, समाधान ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, इस्माईल तडवी आणि विकार शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आरोपीला अल्पावधीत जेरबंद करण्यात यश मिळवले.

Previous Post

सत्तेची मग्रुरी लोकशाहीला परवडेल?

Next Post

मनोज जरांगे पाटील कडाडले

Next Post
मनोज जरांगे पाटील कडाडले

मनोज जरांगे पाटील कडाडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..