Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील कडाडले

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 23, 2026
in शैक्षणिक, सामाजिक
0
मनोज जरांगे पाटील कडाडले

नवी दिल्ली/प्रशांत बाफना
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळं वळण आले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील दिल्लीत दाखल झाले. जंतर-मंतरवर जाऊ त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

जंतर-मंतरवरून मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आणि आपल्या मायबापांनी यांना मतदान केले. आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केले. आपल्या जिल्ह्यांनी तालुक्यांनी यांना मतदान केले आहे. पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा- बाळांवरती उलटले आहेत. यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेमध्ये आहे हे यांच्या लक्षात नाही आहे.

तसंच, ‘जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द मी देतो. पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही.’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला दिला आहे. इथे जी पोरं बसले आहेत त्यांची तळमळ आहे. पण एखाद्या निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत राहिले तर न्याय मिळतो. जंतर मंतरची जागा ही आंदोलनाची जागा आहे त्यामुळे इथे ते काही करू शकत नाहीत त्यामुळे आंदोलकांनी ही जागा सोडून नये.’, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले

Previous Post

गारखेड्यात खळबळ! जमिनीच्या वादातून काकाची हत्या; सख्खा पुतण्या जेरबंद

Next Post

धर्म बचाव की धर्मेन्द्र बचाव

Next Post
धर्म बचाव की धर्मेन्द्र बचाव

धर्म बचाव की धर्मेन्द्र बचाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..