Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खिर्डी–ऐनपूर–निभोरा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात उद्यापासून उपोषण; ग्रामपंचायत सदस्य गणेश देवगीरीकर यांचा इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 25, 2026
in सामाजिक
0
खिर्डी–ऐनपूर–निभोरा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात उद्यापासून उपोषण; ग्रामपंचायत सदस्य गणेश देवगीरीकर यांचा इशारा

रावेर तालुका प्रतिनिधी | उमेश तायडे

खिर्डी (ता. रावेर): खिर्डी येथील बसथांबा ते जिल्हा परिषद शाळा तसेच खिर्डी–ऐनपूर–निभोरा उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य गणेश देवगीरीकर हे रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी बेमुदत उपोषण व रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले असून महसूल विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव तसेच संबंधित प्रशासनालाही निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत.

देवगीरीकर यांनी यापूर्वीही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कामाला सुरुवात न झाल्याने अखेर ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच गटारी व पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर साचलेले दूषित पाणी, दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा निर्धार गणेश देवगीरीकर यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Previous Post

CJP आंदोलनाला मोठं यश; धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा; आज काय घडलं पहा.

Next Post

मराठी पोराने दिल्ली तख्ताला गदा गदा हलवलेगर्जा महाराष्ट्र माझा

Next Post
मराठी पोराने दिल्ली तख्ताला गदा गदा हलवलेगर्जा महाराष्ट्र माझा

मराठी पोराने दिल्ली तख्ताला गदा गदा हलवलेगर्जा महाराष्ट्र माझा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..