
अहिल्यानगर | प्रतिनिधी
जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या संघटन विस्ताराला बळकटी देत पत्रकार प्रशांत प्रकाश बाफना यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर तसेच महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व पोलीस मित्र समितीचे राज्य समन्वयक विनायक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नियुक्तीनंतर प्रशांत बाफना यांचे जनकल्याण मराठी पत्रकार संघात सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढेल तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख तसेच बळीराजा हक्क समिती व पोलीस मित्र समितीचे राज्य समन्वयक विनायक इनामदार यांनी प्रशांत बाफना यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.







