Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 7, 2026
in क्राईम
0
पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने पहाटेच्या धडक कारवाईत बेकायदेशीर वनउत्पादन वाहतुकीचा मोठा पर्दाफाश केला. पाठलाग करून तस्करीसाठी वापरण्यात येणारी नॅनो कार जप्त करण्यात आली असून, त्यामधून 1008 नग सागाचे अनघड बेलन हस्तगत करण्यात आले. वाहनचालक मात्र अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.आज पहाटे सुमारे 2.00 वाजल्यापासून यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने वऱ्हागावण–लोणी (पंचक) मार्गावर सापळा रचला होता. सकाळी अंदाजे 6.50 वाजता पांढऱ्या रंगाची संशयास्पद नॅनो कार येताना दिसताच वन कर्मचाऱ्यांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने भरधाव वेगाने वाहन पळवून नेले.वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग केला. साई मंदिराजवळील केळीच्या बागेत वाहन लपवून चालकाने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. वाहन सुरू होत नसल्याने वनक्षेत्रपाल अडावत यांच्या शासकीय वाहनाच्या मदतीने नॅनो कार टोचन करून मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे आणण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये 1008 नग सागाचे अनघड बेलन आढळून आले. जप्त वाहन व वनउत्पादन ताबा पावतीद्वारे मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा करण्यात आले असून, पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.ही धडक कारवाई मा. उपवनसंरक्षक श्री. सौरिष सहाय, मा. विभागीय वनाधिकारी (दक्षता) श्री. राजेंद्र सदगीर, मा. सहायक वनसंरक्षक श्री. एम. बी. पाटील आणि मा. सहायक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महेश पाटील, वनपाल श्री. के. एल. धनगर, वनपाल श्री. संजय पाटील, वनरक्षक श्री. सतीश वाघमारे, वनरक्षक श्री. आय. बी. चव्हाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री. एस. आर. तडवी यांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.वन विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे बेकायदेशीर वनउत्पादन तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Previous Post

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी रावेर तालुक्यात जनजागृती; १० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

Next Post
अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..