Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! – जरांगे पाटील

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 10, 2026
in सामाजिक
0
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! – जरांगे पाटील

सोलापूर :/प्रशांत बाफना सरकार जसा त्रास मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे. तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, असा आक्रमक सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा आरक्षण मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोनाच्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यावर आहे. आज सोलापूर शहर, पंढरपूर, माढा, वैराग, सांगोला, सरकोली, वडाळा या ठिकाणी जाहीर सभा व संवाद बैठका घेतल्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. मंत्री बावनकुळे यांच्यावर त्यांनी व्यंगात्म टीका करत कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे मंत्री बावनकुळेच असल्याचे सांगत त्यांनी सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षण मुद्यावर जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील म्हणाले की, तीन वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कट रचले, शेवटच्या टप्यात मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा कच शिजला. तीन वर्षापूर्वी सरकारने नोंदी शोधल्या त्यांनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले. नोंदी शोधल्या सरकारच्या समितीने त्याच नोंदीनुसार मिळालेले कुणबी प्रमाणपत्र बावनकुळे यांच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप केलं.

मराठवाड्यात मिळालेल्या नोंदीमुळे 2.50 कोटी मराठा बांधव आरक्षणात गेला. सरकारने डोकं लावलं आणि गॅझेटिअर म्हटलं तर मराठा सगळाच आरक्षणात जाणार. एकट्या कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटीअरमध्ये जवळपास तीन लाख नोंदी आहे आणि ते लागू केलं तर 6 कोटी मराठा आरक्षणात जाणार. म्हणून त्यांनी मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मिळालेलं प्रमाणपत्र टिकणार नाही असा गैरसमज पसरवण्याचा कट रचला. किमान चार नोंदी रद्द करून मीडिया ट्रायल करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. मी कलेक्टर साहेबांना विचारलं की प्रमाणपत्र देण्याचं का रोखलं, त्यावर कलेक्टर म्हणाले मंत्री बावनकुळे यांनी पत्र काढलं आहे. की पाच दिवसांच्या आत मराठ्यांना दिलेले प्रमाणपत्र रद्द करा असं पत्र असल्याचं कलेक्टरांनी सांगितलं. बावनकुळे कुठून आला काय कळत नाही, हडप्पा, मोहेजोदडो, वेरुळच्या लेण्यावर कोरलेल्या शिल्पासारखा दिसत असल्याची व्यंगात्मक टीकाही यावेळी जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षण आंमलबजावणीस चालढकल केली तर सरकारला 2029 च्या निवडणुकांत गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

मी मराठा समाजाला माय- बाप मानलंय, एखाद्या मुलासमोर माय- बापाचा आपमान होत असेल तर तो शांत बसणार का?, नाही ना, म्हणून मी कचाकच त्यांना घोडे लातोय. आता शेवटचां लढा उभा करायचा आहे. आता तुकडाच पाडायचा काही झाला तरी पाचही गॅझेट घेतल्याशिवाय मागे हाटणार नाही त्यासाठी तुम्ही 29 ऑगस्टला एकानेही घरी न थांबता सगळ्यांनी आंतरवाली सराटीला यायचं असं अवाहनही त्यांनी केलं.

Previous Post

मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

Next Post

शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर!; कथित टोळ्यांना पोसणारा कोण?

Next Post
शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर!; कथित टोळ्यांना पोसणारा कोण?

शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर!; कथित टोळ्यांना पोसणारा कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..