Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाल ता. रावेर येथील आदिवासी विकास विभागाची भूखंड जागा तरुणांच्या भविष्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र व सरावासाठी द्यावी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 19, 2026
in सामाजिक
0
पाल ता. रावेर येथील आदिवासी विकास विभागाची भूखंड जागा तरुणांच्या भविष्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र व सरावासाठी द्यावी

आदिवासी तडवी भिल्ल महापंचायत यांची प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मागणी

उपसंपादक मन्सूर तडवी

रावेर तालुक्यातील पाल येथील गट नंबर २८८ मधील आदिवासी विकास विभागाच्या ८० आर जागेवर काही नागरिकांकडून अतिक्रमण होत आहे. भविष्यात ही जागा मोकळी करणे अवघड होईल या भीतीने आदिवासी तडवी भिल्ल महापंचायत चे पद अधिकारी यांनी यावल येथील प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

महापंचायतीच्या म्हणण्यानुसार सद्या तरुण मुलांसाठी भरतीपूर्व शारीरिक प्रशिक्षण, व्यायाम किंवा इतर भरती निहाय प्रशिक्षणासाठी आदिवासी मुलांसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे स्वतःची जागा नसल्याने पाल परिसरातील आदिवासी तरुण भरतीपासून वंचित राहत आहेत.

या पार्श्वभूमीवर सदर भूखंड जागा आदिवासी प्रकल्प विभाग यावल मार्फत विकसित करून द्यावी. ग्रामपंचायतीची याला कोणतीही हरकत नाही. किंवा सदर जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी जेणेकरून त्या ठिकाणी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करून तरुणांना भरतीचा सराव घेता येईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदन देताना उपस्थित:
महापंचायत चे अध्यक्ष रशीद सुभान तडवी, कार्याध्यक्ष सौ. मीना राजू तडवी, हिशोब तपासणीस मुख्तार फकिरा तडवी, ज्येष्ठ सल्लागार मुनाफजुम्मा तडवी, ज्येष्ठ सल्लागार हबीब नबाब तडवी ज्येष्ठ सल्लागार कामिल नामदार तडवी, राज्य प्रसिद्धी प्रमुख मन्सूर तडवी, राज्य सदस्य फिरोजअबाज तडवी, राज्य सदस्य नशीर इब्राहिम तडवी, राज्य सदस्य उस्मान रमजान तडवी, राज्य सदस्य हुसैन जहांगीर तडवी, आरिफ तडवी हे पदाधिकारी उपस्थित होते. आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी युनूस तडवी यांनी वेळ प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी यासंदर्भात सांगितले की शासनाला पाठपुरावा करून भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल याची गव्हाही देण्यात आली तसेच ज्येष्ठ सल्लागार मुनाफ तडवी यांनी सातपुडा पर्वतातील नैसर्गिक वनस्पती जडीबुटी पासून होणारे फायदे यापासून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल असे यावेळी नमूद करण्यात आले आणि आदिवासी विभागाकडून पाल तालुका रावेर येथे भेट देऊन रोजगारासाठी मार्गदर्शन करावे असे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना महापंचायतचे पदाधिकारी यांनी विनंती केली

Previous Post

ना सनईचा मंजुळ सूर! ना नऊवारीतील घुंगरांचा नाद! ना दर्दी रसिक!

Next Post

श्री .विलास नाना साळवे यांनी केली पहाटे गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची पाहणी

Next Post
श्री .विलास नाना साळवे यांनी केली पहाटे गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची पाहणी

श्री .विलास नाना साळवे यांनी केली पहाटे गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..