Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साखरेचा भाव गगनाला: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाववाढीला जाबाबदार कोण?, इथेनॉल धोरण का साठेबाजी?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 25, 2026
in देश-विदेश
0
साखरेचा भाव गगनाला: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाववाढीला जाबाबदार कोण?, इथेनॉल धोरण का साठेबाजी?

बीड/प्रशांत बाफना
आधीच माहागाईने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना गोड साखरेच्या भाववाढीचा धक्का बसला आहे. साखरेच्या किरकोळ दराने 70 रुपये टप्पा गाठल्याने सर्वसामन्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. त्यामुळे साखरेच्या भाववाढीला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

साखर महागली की, केवळ घरातीलच चहाचा खर्च वाढत नाही, तर साखरेचा वापर होणार्‍या विविध खाद्यपदार्थांच्या किमतीवरही त्याचाव अप्रत्यक्ष परिणाम होतो. चहा, मिठाई, मोदक, लाढू, पेढे, जिलेबी, गुलाबजामून, श्रीखंड, बासुंदी, बिस्कीटे, केक, पेस्ट्री, ब्रेड तसेच विविध बेकरी पदार्थ महागण्याची शक्यता वाढते. विशेषत: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांची मागणी वाढत असताना साखरेच्या दरवाढीचा आर्थिक फटका सामान्य कुटुंबांवर पडू शकतो.

साखरेच्या दरवाढीमागे मागणी- पुरवठ्यातील तफावत, साखर उत्पादनातील घट, बाजारातील उपलब्ध साठा, उत्पादन खर्च आणि इतर विविध घटक कारणीभूत असू शकतात.

त्याचबरोबर इथेनॉल निर्मितीसाठी ऊस व सायरेच्या उत्पादनातील काही भागाचा वापर होत असल्याने त्याचा साखरेच्या उपलब्धतेवर आणि दरावरप कितपत परिणाम होतो, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे इथेनॉल धोरणाचा साखरेच्या बाजारभावावर नेमका किती परिणाम झाला, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे.

बाजारातील साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईच्या चर्चेमुळेही साखरेच्यवा वाढत्या दरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर काही व्यापार्‍यांकडून अनावश्यक साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असेल, तर त्याचा थेट फटका ग्राहकांना बसतो. त्यामुळे शासनाने व्यापार्‍यांच्या साठ्याची तपासणी, साठवणूक मर्यादेचे पालन आणि बाजारातील उपलब्ध साखरेच्या साठ्याची पारदर्शक माहिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. साखरेच्या दरवाढीचा प्रश्न केवळ ग्राहकांपुरता मर्यादित नाही.

ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने, इथेनॉल निर्मिती, व्यापारी, सरकार आणि ग्राहक अशा संपूर्ण साखळीशी साखरेचे अर्थकारण जोडलेले आहे. शेतकरी ऊस उत्पादनासाठी खर्च सहन करतो, तर ग्राहक महाग साखर खरेदी करतो. मग या संपूर्ण साखळीमध्ये वाढत्या दराचा फायदा नेमका कोणाला होतो, याचे पारदर्शक उत्तर आता सरकारने जनेतेसमोर ठवेणे गरजेचे आहे

Previous Post

जरांगे पाटलांची लढाई आमच्या विरोधात नाही – मंत्री छगन भुजबळ

Next Post

विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Next Post
विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..