Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गाव PESA क्षेत्रात समाविष्ट करा; 15 सप्टेंबरपासून उपोषण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 12, 2026
in शासकीय
0
चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गाव PESA क्षेत्रात समाविष्ट करा; 15 सप्टेंबरपासून उपोषण

उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा / यावल : चोपडा तालुक्यातील मौजे वरगव्हाण व इतर बहुल आदिवासी गावे PESA (पेसा) क्षेत्रात समाविष्ट करावीत, या प्रमुख मागणीसह आदिवासी तडवी भिल एकता मंच, महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे दि. 15/09/2026 पासून उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एकता मंच संघटनेतर्फे देण्यात आली आहे
संघटनेने दि. 31/08/2026 रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय, यावल यांना वरगव्हाण गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर दि. 04/09/2026 रोजी आदिवासी समाजाच्या विविध हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा निवेदन देण्यात आले. 8 दिवस उलटूनही कार्यालयाने मागण्यांचे गांभीर्याने विचार न केल्याने अखेर उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवेदनातील प्रमुख 10 मागण्या:

  1. आदिवासी विकास विभागाचा कोणताही निधी इतर विभागांना न देता सर्व योजना थेट प्रकल्प कार्यालयामार्फतच राबवाव्यात.
  2. तात्पुरती बंद असलेली शबरी घरकुल योजना पूर्ववत सुरू करावी.
  3. न्यूक्लियस बजेट योजनेत वैयक्तिक लाभ 50 हजारांवरून 1 लाख करावा व 100% अनुदान द्यावे.
  4. ठक्करबाप्पा योजना व धरती आबा योजना प्रभावीपणे राबवावी.
  5. पाचोरा तालुक्यात व भविष्यात जिल्हा होण्याची शक्यता असलेल्या भुसावळ शहरात आदिवासी मुला-मुलींसाठी नवीन शासकीय वस्तीगृहे सुरू करावीत.
  6. आश्रमशाळा व वस्तीगृहातील सर्व कंत्राट/टेंडर स्थानिक आदिवासी बांधवांनाच द्यावेत.
  7. यावल तालुक्यातील अतिदुर्गम गाड्या, जामन्या, उसमळी व लंगडाआंबा या गावांना/पाड्यांना पक्के रस्ते द्यावेत.
  8. शबरी वित्त व विकास महामंडळ (नाशिक) अंतर्गत सन 2024-25 मधील मंजूर कर्ज तात्काळ वितरित करावे व 35% सबसिडी लागू करावी.
  9. वनहक्क कायदा 2006 अंतर्गत प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढावेत.
  10. मौजे वरगव्हाण ता. चोपडा सह इतर आदिवासी बहुल गावे तात्काळ PESA क्षेत्रात समाविष्ट करावीत.
Previous Post

जिल्हा बँकेचा चेअरमन पदावर डॉ .सुजय विखे यांची वर्णी लागणार ?मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील व्यक्तव्यामुळे चर्चेला उधान

Next Post

समाजसेवेची दखल घेत राजू सवर्णे यांचा गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘समाजसेवी’ पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..