Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दारूच्या व्यसनाला कंटाळून सख्ख्या भावाचा खून!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 20, 2026
in क्राईम
0
दारूच्या व्यसनाला कंटाळून सख्ख्या भावाचा खून!

स्वतःच्या लग्नाला अडसर ठरत असल्याने लहान भावानेच मोठ्या भावाला संपवल्याचा पोलिसांचा तपास

राहुरी तालुका प्रतिनिधी – प्रविण पाळंदे

श्रीरामपूर : दारूच्या व्यसनामुळे घरात सुरू असलेला सततचा त्रास आणि त्याचा आपल्या लग्नावर होत असलेला कथित परिणाम याला कंटाळून लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय 27) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अनिकेत विजय पारखे (वय 26) याच्यावर खुनाचा आरोप असून, पोलिसांच्या तपासानुसार मोठ्या भावाच्या दारूच्या व्यसनामुळे आणि त्यामुळे स्वतःचे लग्न जमत नसल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

घरात मृतदेह; जखमांमुळे पोलिसांना संशय

दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी आशिष हा त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डाव्या कानाखाली तसेच मानेला गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे पाठविण्यात आला. वैद्यकीय अहवालात टणक हत्याराने झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि ही नैसर्गिक मृत्यूची घटना नसून घातपात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

दारूच्या व्यसनामुळे घरातील वातावरण बिघडले

पोलिसांनी मृताच्या पत्नी तसेच नातेवाईकांची कसून चौकशी केली. त्यातून आशिषला दारूचे तीव्र व्यसन असल्याची माहिती समोर आली. दारूच्या नशेत तो घरात आरडाओरड करत असल्याचेही तपासात समोर आले.

या सततच्या त्रासामुळे आशिषची पत्नी काही दिवसांपासून आपल्या आई-वडिलांकडे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, मोठ्या भावाच्या दारू पिण्याच्या आणि घरातील वातावरण बिघडविण्याच्या सवयीमुळे आपले लग्न जमत नाही, अशी भावना लहान भाऊ अनिकेतच्या मनात निर्माण झाल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून पुढे आला.

पोलिसांच्या चौकशीत संशयाची सुई भावाकडे

घटनेनंतर पोलिसांनी कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईकांची चौकशी सुरू केली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अक्षय पारखे आणि अनिकेत पारखे या दोघा भावांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे अनिकेतवर संशय अधिक बळावला.

या प्रकरणात नेमका खून कसा आणि कोणत्या हत्याराने करण्यात आला, यासह घटनेमागील सर्व बाबींचा पोलीस तपास सुरू आहे.

श्रीरामपूर पोलिसांची अवघ्या काही तासांत कारवाई

या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता तपासाला गती दिली. पोलीस अधीक्षक सुदर्शन गुम्मे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.

या प्रकरणी मृत आशिषची पत्नी साक्षी पारखे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत असून, या थरारक खून प्रकरणातील इतर बाबी तपासानंतर समोर येणार आहेत.

दारूच्या व्यसनातून सुरू झालेला घरातील संघर्ष अखेर सख्ख्या भावाच्या जीवावर बेतल्याने उक्कलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी संचलित बाहेती कॉलेजच्या कथित अतिक्रमणाची चौकशी; प्रशासनाने घेतली काबरांच्या तक्रारीची दखल !

Next Post

मंत्री विखे पाटीलांनी घेतली मनोज जरांगेची भेट संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..