Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर मध्ये गणपती विसर्जन मार्गावर किरकोळ दगडफेक काही काळ तणाव घरगुती गणपती विसर्जनासाठी नेत असताना रिक्षा अडवण्याचा आरोप चार महिला जखमी, 15 ते 20 जणांविरुद्ध अल्ट्रासिटीसह दंगलीचा गुन्हा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 21, 2026
in क्राईम
0
रावेर मध्ये गणपती विसर्जन मार्गावर किरकोळ दगडफेक काही काळ तणाव घरगुती गणपती विसर्जनासाठी नेत असताना रिक्षा अडवण्याचा आरोप चार महिला जखमी, 15 ते 20 जणांविरुद्ध अल्ट्रासिटीसह दंगलीचा गुन्हा

रावेर प्रतिनिधी :- उमेश तायडे शहरात रविवारी घरगुती गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.घरगुती गणपतीची मूर्ती रिक्षातून विसर्जनासाठी नेत असताना काही व्यक्तींनी रिक्षा अडवून पुढे जाण्यास विरोध केल्याने सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही सेकंद किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत चार महिलांना दुखापत होऊन त्या जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी लताबाई ईश्वर घेटे(वय 35) यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून 15 ते 20 जणांविरुद्ध अल्ट्रॉसिटि कायद्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा शोध घेऊन अटकेची कारवाई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर संबंधित घरगुती गणपतीचे विसर्जन शांततेत पार पडले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी रावेर पोलीस ठाण्यात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. घटनेमागील कारणे तसेच संबंधित व्यक्तींची माहिती पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
संशयीतांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रावेर शहरात शांतता
घटनेनंतर रावेर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे. आगामी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून वाढीव बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणतेही अफवा अथवा अप्रमानीत माहितीवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर खात्री न झालेली माहिती, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत.असे आवाहन रावेर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, एपीआय अमोल बच्छाव, आणि पीएसआय मनोज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Previous Post

50 फूट खोल विहिरीत दोन दिवस मृत्यूशी झुंज; मोबाईल सुरू झाला अन्‌‍ मिळाले जीवनदान! पाथर्डी तालुक्यातील मिरीतील घटना

Next Post

गुहा येथील शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सवानिमित्ताने मोफत रक्तदाब व साखर तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..