Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

50 फूट खोल विहिरीत दोन दिवस मृत्यूशी झुंज; मोबाईल सुरू झाला अन्‌‍ मिळाले जीवनदान! पाथर्डी तालुक्यातील मिरीतील घटना

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 20, 2026
in अपघात
0
50 फूट खोल विहिरीत दोन दिवस मृत्यूशी झुंज; मोबाईल सुरू झाला अन्‌‍ मिळाले जीवनदान! पाथर्डी तालुक्यातील मिरीतील घटना

प्रशांत बाफना । अहिल्यानगर
पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे सरपण आणण्यासाठी घराबाहेर पडलेला एक ग्रामस्थ सुमारे 50 फूट खोल आणि अवघ्या तीन फूट रुंदीच्या अरुंद विहिरीत पडला. दोन दिवसांहून अधिक काळ विहिरीत अडकूनही तो जिवंत राहिला. बंद पडलेला मोबाईल अचानक सुरू झाल्यानंतर त्याने कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आपला ठावठिकाणा सांगितला. त्यानंतर युवकांनी दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरून त्याला सुखरूप बाहेर काढले. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे घडलेल्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित ग्रामस्थ घरातील चुलीसाठी सरपण आणण्याच्या उद्देशाने घराजवळ असलेल्या एका पडक्या वाड्यात गेला होता. वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत आणि झुडपे वाढलेली असल्याने तेथे असलेल्या अरुंद विहिरीचा त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे तो अचानक सुमारे 50 फूट खोल विहिरीत कोसळला.विहिरीत पडल्यानंतर त्याने मदतीसाठी अनेकदा आरडाओरडा केला.

मात्र विहीर अत्यंत खोल व अरुंद असल्याने, तसेच ती घरांपासून काही अंतरावर असल्यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंतही पोहोचला नाही. दुसरीकडे, तो दिवसभर घरी न परतल्याने मुले व पुतण्यांनी त्याचा शोध सुरू केला. नेहमीच्या वावरातील ठिकाणे, नातेवाइकांची घरे आणि आसपासच्या गावांमध्ये शोध घेण्यात आला. गावातील आणि परिसरातील व्हॉट्स अप समूहांवर त्याचा फोटो व माहिती प्रसारित करून नागरिकांनाही शोधकार्यात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. अखेर पाथर्डी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली.सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

दरम्यान, विहिरीत पडल्यानंतर बंद झालेला त्याचा मोबाईल दोन दिवसांनी अचानक सुरू झाला. त्याने कुटुंबीयांना फोन करून, मी घराजवळील पडक्या वाड्यातील विहिरीत पडलो आहे, अशी माहिती दिली. बेपत्ता वडिलांचा आवाज ऐकताच कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांनी तातडीने वाड्याच्या परिसरात शोध सुरू केला.परिसरातील विविध विहिरी तपासूनही तो दिसून येत नव्हता. अखेर जवळच असलेल्या जुन्या वाड्यातील गवताने झाकलेल्या अरुंद विहिरीत बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता तो खाली असल्याचे दिसले. त्याचा आवाजही ऐकू आल्याने कुटुंबीयांनी मदतीसाठी युवकांना बोलावले.काही धाडसी युवकांनी दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरून अत्यंत काळजीपूर्वक त्याला बाहेर काढले. विहीर अवघी तीन फूट रुंद असल्यामुळे दीर्घकाळ पाय सरळ करता न आल्याने त्याचे हात-पाय जखडले होते. विहिरीत कोसळताना त्याच्या हातालाही दुखापत झाली. त्याला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

अंगावरून दोन वेळा साप गेला
विहिरीत पडल्यावर बंद झालेला मोबाईल दोन दिवसांनी अचानक सुरू झाला आणि सुमारे 50 फूट खोल विहिरीतही नेटवर्क मिळाले. त्यामुळे संबंधित ग्रामस्थाला कुटुंबीयांशी संपर्क साधता आला. या काळात अंगावरून दोन वेळा साप गेला. जर साप चावला असता, मोबाईल सुरू झाला नसता, विहिरीत पाणी असते किंवा या काळात मुसळधार पाऊस पडून पाणी साचले असते, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. दैव बलवत्तर म्हणूनच त्याला जीवनदान मिळाल्याची चर्चा मिरी परिसरात सुरू होती

Previous Post

मंत्री विखे पाटीलांनी घेतली मनोज जरांगेची भेट संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस

Next Post

रावेर मध्ये गणपती विसर्जन मार्गावर किरकोळ दगडफेक काही काळ तणाव घरगुती गणपती विसर्जनासाठी नेत असताना रिक्षा अडवण्याचा आरोप चार महिला जखमी, 15 ते 20 जणांविरुद्ध अल्ट्रासिटीसह दंगलीचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..