Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मिरी ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी सुरू : त्रिसदस्यीय समिती दाखल चौदावा व पंधरावा वित्त आयोगातील कामे रडारवर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 1, 2026
in शासकीय
0
मिरी ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी सुरू : त्रिसदस्यीय समिती दाखल चौदावा व पंधरावा वित्त आयोगातील कामे रडारवर

अहिल्यानगर। प्रशांत बाफना
वरिष्ठांच्या आदेशानुसार मिरी ग्रामपंचायतीच्या सन 2020 ते 2026 या कालावधीतील चौदावा आणि पंधरावा वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामांच्या चौकशीला गुरुवारी (दि. 1) सुरुवात झाली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीने ग्रामपंचायत कार्यालयात अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेत चौकशीची पुढील कार्यपद्धती स्पष्ट केली.

या चौकशी समितीमध्ये बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एच. खेडकर आणि पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता जी. बी. बनकर यांचा समावेश आहे. यावेळी अर्जदार उज्ज्वला जालिंदर गवळी, ग्रामसेवक रमेश त्रिंबके यांच्यासह गावातील युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अर्जदार आणि चौकशी अधिकाऱ्यांमध्ये सुमारे दोन तास तक्रारीतील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

सन 2020 ते 2026 या कालावधीत चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या सर्व कामांची वस्तुनिष्ठ चौकशी केली जाणार असल्याचे विस्तार अधिकारी गिऱ्हे यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेत अर्जदाराचे म्हणणे नोंदविणे, प्रशासकीय अभिलेख तपासणे, ऑनलाइन बिलांची पडताळणी करणे, तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित व्यक्तींचे म्हणणे जाणून घेणे, कामांची प्रत्यक्ष पाहणी करणे तसेच संबंधित कालावधीतील बँक स्टेटमेंट तपासणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.प्रत्येक कामाची कागदोपत्री व प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबींचा एकत्रित चौकशी अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार असल्याचे समितीने सांगितले. अर्जदार गवळी यांना चौकशीची कार्यपद्धती आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर नियोजित कार्यपद्धतीनुसार चौकशी करण्यास त्यांनी सहमती दर्शविली.

दरम्यान, विस्तार अधिकारी गिऱ्हे यांनी ग्रामसेवक रमेश त्रिंबके यांना सन 2020 ते 2026 या कालावधीतील चौदावा आणि पंधरावा वित्त आयोगांतर्गत झालेल्या सर्व कामांशी संबंधित प्रशासकीय कागदपत्रे, अभिलेखे आणि फायली एकत्रितरीत्या तपासणीसाठी उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व फायली व कागदपत्रे एकत्र करून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतील, असे ग्रामसेवक त्रिंबके यांनी सांगितले.

संपूर्ण अभिलेख उपलब्ध झाल्यानंतर चौकशी समिती पुन्हा मिरीत येणार आहे. प्रथम प्रशासकीय नोंदी आणि आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर अर्जदाराने संशय व्यक्त केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे मिरीकरांचे लक्ष लागले आहे.
यावेळी माजी उपसरपंच संजय शिंदे, जालिंदर गवळी, हरी दाणे, वैभव शिंदे, संभाजी दारकुंडे, संतोष शेळके यांच्यासह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकशी पूर्ण होण्यापूर्वी दोष निश्चिती नाही
अर्जदाराचे म्हणणे नोंदविणे, ग्रामपंचायतीच्या अभिलेखांची तपासणी, ऑनलाइन बिले व बँक स्टेटमेंटची पडताळणी, तत्कालीन पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे, तसेच संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी अशा विविध टप्प्यांत ही वस्तुनिष्ठ चौकशी होणार आहे. तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणावरही दोष निश्चित करता येणार नाही.
– संजय गिऱ्हे. चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी, पाथर्डी

Previous Post

धानोरा जि.प. शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

Next Post

वांबोरी रेल्वे गेट जवळील श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर

Next Post
वांबोरी रेल्वे गेट जवळील श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर

वांबोरी रेल्वे गेट जवळील श्री जगदंबा देवी ट्रस्टच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..