
उपसंपादक मन्सूर तडवी
धानोरा ता. चोपडा – जि.प. केंद्र शाळा, धानोरा येथे माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चोपडा तालुकाध्यक्ष कबीर एस. तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अंबादास पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती माणिकचंद (बापू) महाजन, अशोक महाजन, सचिन महाले, नयनाताई कोळी व इतर पालक ग्रामस्थ उपस्थित होते.







