
राहुरी तालुका प्रतिनिधी – ( प्रविण पाळंदे )
मुळा आणि प्रवरा नदीवर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या आठ बंधाऱ्यामुळे राहुरी तालुक्याबरोबरच शेजारील तालुक्यांना दुष्काळात मोठी जलसंजीवनी मिळाली आहे .
मुळा व प्रवारा नदीवर मानोरी मांजरी केसापूर डिग्रस वांजुळपोई पाथरे (वांगी ) व नगर तालुक्यातील नांदगाव या आठ ठिकाणी हे बंधारे बांधण्यात आले आहेत एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तरी या बंधाऱ्यामुळे राहुरी नेवासा श्रीरामपूर या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे .
१९७२ च्या भीषण दुष्काळात पाखरेही तडफडून मरत होती आशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या दूरदृष्टीतून माजी खासदार प्रसाद राव तनपुरे यांच्याकडे त्यावेळी कुठलेही सत्ता नसतानाही या बंधाऱ्याची निर्मिती केली आता मुळा धरणातून या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जाते त्यामुळे बंधारे वर्षभर भरलेले राहतात याचा थेट फायदा शेतीला जनावरांना आणि ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला होत आहे .







