Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

१४ दिवसांच्या उपचारानंतर ‘लाँग-बिल्ड व्हल्चर’ची निसर्गात यशस्वी मुक्तता

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 4, 2026
in आरोग्य, सामाजिक
0
१४ दिवसांच्या उपचारानंतर ‘लाँग-बिल्ड व्हल्चर’ची निसर्गात यशस्वी मुक्तता


सर्पराज्ञीतील उपचारांना मिळाले यश; वनविभागाच्या उपस्थितीत गिधाडाने घेतली आकाशात भरारी
………………….
बीड/प्रशांत बाफना
मेळघाटहून बीड जिल्ह्यात आलेल्या दुर्मिळ व संकटग्रस्त लाँग-बिल्ड व्हल्चर अर्थात भारतीय गिधाडाला (Gyps indicus) सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात गेल्या १४ दिवसांपासून उपचार व देखभाल करण्यात येत होती. उपचारानंतर गिधाड पूर्णपणे निरोगी झाल्याने दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता विभागीय वन अधिकारी अमोल गरगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला निसर्गाच्या मुक्त अधिवासात यशस्वीपणे सोडण्यात आले.
माजलगाव परिसरातील सिरसदेवी-गाडी मार्गावर जखमी अवस्थेत हे गिधाड आढळून आले होते. स्थानिक शेतकरी पवार यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून त्याला तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गिधाडाच्या पायावरील टॅगवरून त्याची ओळख Z-29 अशी झाली होती. उपलब्ध माहितीनुसार हे नर लाँग-बिल्ड व्हल्चर असून त्याला यापूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून संवर्धन कार्यक्रमांतर्गत निसर्गात मुक्त करण्यात आले होते.
सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर आवश्यक उपचार, आहार व विशेष देखभाल करण्यात आली. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून तो नैसर्गिक अधिवासात परतण्यास सक्षम झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला मुक्त करण्यात आले.
गिधाडाच्या मुक्ततेप्रसंगी , मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे तसेच छत्रपती संभाजीनगरचे मानद वन्यजीव रक्षक आशिष जोशी,
अमोल सांगुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी बीड (प्रा.)
अमोल घोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा (प्रा.)
प्रतिक जोशी (वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक, बीड) मंगेश पवळ
(वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, धारूर)
अतुल पारखे
(वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, परळी)
श्रीमती. प्राची रणदिवे
(वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, शिरूर कासार)
उपस्थित होते. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या हस्ते गिधाडाला निसर्गात मुक्त करण्यात आले.
गिधाड हे निसर्गातील महत्त्वाचे सफाई कर्मचारी असून मृत प्राण्यांचे अवशेष नष्ट करून पर्यावरणातील जैविक संतुलन राखण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. मात्र अधिवासाचा ऱ्हास, अन्नाची कमतरता, विषबाधा आणि मानवी हस्तक्षेपामुळे गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे अशा संकटग्रस्त गिधाडाचे उपचार करून पुन्हा त्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करणे हे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
………………
“पूर्णपणे बरे झाल्यानंतर गिधाडाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन्यजीवांच्या उपचारासोबतच त्यांना पुन्हा निसर्गात सुरक्षितपणे परतविणे हे सर्पराज्ञीचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” अशी भावना सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी व्यक्त केली

Previous Post

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या दूरदृष्टीमुळे उभारलेले आठ बंधारे ठरले जलसंजीवनी

Next Post

पोलिसांच्या गणवेशात कोण करतंय वाहनधारकांची कथित वसुली?

Next Post
पोलिसांच्या गणवेशात कोण करतंय वाहनधारकांची कथित वसुली?

पोलिसांच्या गणवेशात कोण करतंय वाहनधारकांची कथित वसुली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..