
राहुरी तालुका प्रतिनिधी – ( प्रविण पाळंदे )
राहुरी येथील एसबीआय बँकेच्या शाखेत विद्यार्थ्यांना खाते उघडण्यासाठी 3100 रुपये घेतल्याचा आरोप आरपीआयचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केला आहे विलास साळवे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी एसबीआय बँकेच्या शाखेत खाते उघडण्यासाठी गेली असता खाते उघडण्यासाठी 3100 लागतील असे तिला त्या शाखेमध्ये सांगण्यात आले ही रक्कम भरली असता खाते सुरू झाले पण बँकेच्या खाते बुक मध्ये शंभर रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले .
याबाबत बँक अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता 3000 रुपयांचा विमा उत्तरविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा दावा साळवे यांनी केला आहे मात्र विमा बाबत विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना किंवा पुरेशी माहिती देण्यात आली होती का तसेच या पैशाची पावती किंवा विम्याची पावती दिली का नाही असा सवाल उपस्थितीत साळवे यांनी आक्षेप घेतला गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कामासाठी बँक खाते उघडताना एवढी रक्कम भरावी लागत असेल तर विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो असे साळवे यांनी म्हटले आहे .
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपांची सत्यता तपासावी जोशी आढळल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना नियमानुसार शून्य शिल्लक खाते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विलास साळवे यांनी केली आहे यावेळी विलास साळवे यांच्या समवेत आरपीआयचे प्रवीण लोखंडे सागर साळवे नवीन साळवे राजू साळवे विल्सन आवारे दीपक साळवे आकाश गायकवाड आदिसह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थितीत होते .







