Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शनी अमावास्येसाठी शनैश्चर देवस्थान प्रशासन सज्ज : लाखो भाविक येणार शिंगणापुरात चारचाकींना प्रवेशबंदी, पोलीस अधीक्षकांकडून आढावा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 7, 2026
in धार्मिक
0
शनी अमावास्येसाठी शनैश्चर देवस्थान प्रशासन सज्ज : लाखो भाविक येणार शिंगणापुरात चारचाकींना प्रवेशबंदी, पोलीस अधीक्षकांकडून आढावा

अहिल्यानगर । प्रशांत बाफना
शनैश्चर अमावस्येनिमित्त शनिवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी शनिशिंगणापूर येथे लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलीस, महसूल प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, सुरक्षित दर्शन आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांची संयुक्त आढावा बैठक झाली. त्यानंतर मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच वाहनतळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गनिहाय स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.शिर्डी व कोपरगावमार्गे येणारी वाहने श्री शनेश्वर देवस्थानचे क्षेत्र गट क्र. 809 (सोनई) तसेच मुळा कारखाना परिसरातील वाहनतळावर उभी करावी लागणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी जोगेश्वरी मिसळ मार्गे श्री शनेश्वर देवस्थानच्या क्षेत्र गट क्र. 401 येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

निश्चित पार्किंग क्षेत्राच्या पुढे चारचाकी वाहनांना शिंगणापूर गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसेस व विशेष वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगा आणि मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार कक्ष 24 तास सज्ज ठेवण्यात येणार आहेत. ऑक्टोबरमधील संभाव्य उष्णता लक्षात घेता भाविकांनी टोपी, छत्री आदींचा वापर करावा तसेच पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

चौथरा दर्शन बंद; मुखदर्शनाची व्यवस्था
अमावस्येच्या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. तेल अर्पणासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी देवस्थानच्या मुख्य महाद्वारातून दर्शन रांगेत प्रवेश करावा. महाद्वारात मोठ्या क्षमतेचे तेल साठवणूक टँक बसविण्यात आले असून भाविकांनी आणलेल्या तेलाच्या बाटल्या थेट या टँकमध्ये अर्पण कराव्यात.मोठे तेलाचे डबे अथवा बॉक्स दर्शन रांगेत नेता येणार नाहीत. त्यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र जमा व्यवस्था करण्यात आली आहे

Previous Post

देवळाली नगरपरिषदेने नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली स्थगित करावी – नगरसेवक तुकाराम (दासू ) पठारे यांचे निवेदन

Next Post

राहुरीतील एसबीआय बँकेच्या शाखेत शालेय विद्यार्थ्यांना खाते उघडण्यासाठी 3100 रुपये घेतल्याचा आरोपआरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांची चौकशी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..