
विशेष प्रतिनिधी
ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पॅंथर सतीश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे ही निवड जाहीर केली.
८ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर निष्ठा ठेवून संघटनेची वाटचाल पुढे नेली जावी. तसेच संघटनात्मक बळकटी आणि आंदोलनात्मक भूमिका अधिक प्रभावी करत शोषित, उपेक्षित आणि वंचितांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा सतीश गायकवाड अधिक तीव्र करतील, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीसह सतीश गायकवाड यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस राष्ट्रीय नेतृत्वाकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सतीश गायकवाड यांच्या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रात ऑल इंडिया पॅंथर्स सेनेचे कार्य अधिक विस्तारले जाईल, असा विश्वास व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







