Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

“मॅडम, फोन ठेवा!” जळगाव तालुका पोलीस तपासाधिकारी यांचा उद्धट प्रतिसाद; कार्यकारी संपादकांच्या घरातील चोरी प्रकरणात पोलिसांची ढिलाई!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 12, 2025
in क्राईम
0

जळगाव प्रतिनिधी अमोल खरात
“मॅडम, फोन ठेवा… मला एवढंच काम नाही!” हे वाक्य कुण्या सामान्य नागरिकाला नव्हे तर एका दैनिकाच्या कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांना जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस व बिबा नगर चोरी प्रकरणी तपासाधिकारी यांनी उद्देशून उच्चारल्याचे समजते. हा प्रसंग पोलिसांच्या निष्क्रियतेचा आणि नागरिकांविषयीच्या त्यांच्या बेफिकीरीचा परमोच्च नमुना ठरला आहे.

१० ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात तायडे यांच्या घरी सुमारे ₹५ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. प्रकरणाची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली. परंतु, एक महिना उलटूनही तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.

दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी साई गार्डन हॉटेलजवळ काही संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती मिळाली. या व्यक्तींची वैशिष्ट्ये CCTV फुटेजमधील चोरांशी मिळतीजुळती होती. कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही महत्वाची माहिती दिली. पण, नागरिकांचे ऐकून तत्परतेने कृती करण्याऐवजी पोलिसांनी “फोन ठेवा मॅडम” असे म्हणत तिरस्कारपूर्ण उत्तर दिले.

याच वेळी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाली होती, तेव्हा पोलिसांनी काही तासांत गुन्हा उकलून दाखवला होता. मग सामान्य नागरिक किंवा पत्रकार यांच्याबाबतच पोलिसांचा हा निष्क्रिय आणि अहंकारी वर्तन का?
लोकशाहीत पत्रकार म्हणजे चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी आणि त्यांच्याच सुरक्षिततेकडे पोलिसांनी पाठ फिरवली तर जनतेचा विश्वास कुणावर ठेवायचा?

ही घटना जळगाव तालुका पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची चौकशी करून संबंधित निरीक्षकावर कारवाई करावी, अशी नागरिक व पत्रकार संघटनांची मागणी आहे.

Previous Post

शेवगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नागरिक भयभीत, प्रशासनाकडून दुर्लक्ष.

Next Post

आदिवासी पारधी लक्ष्मण काळे 90 वर्षांपासून गावात घरकुल व शासकीय सवलतींपासून वंचित…जिवंतपणे रहाण्यासाठी जागा द्या नाहीतर, “मृत्यूनंतर तरी दफनासाठी जागा द्या” समाजसेवक नामदेव भोसले

Next Post

आदिवासी पारधी लक्ष्मण काळे 90 वर्षांपासून गावात घरकुल व शासकीय सवलतींपासून वंचित...जिवंतपणे रहाण्यासाठी जागा द्या नाहीतर, "मृत्यूनंतर तरी दफनासाठी जागा द्या” समाजसेवक नामदेव भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..