Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा तहसीलदारांना भीम आर्मीच्या वतीने निवेदन घरकुलासाठी शासनाच्या रिक्त जागेचे वाटप करण्याची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 10, 2025
in सामाजिक
0

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर

ग्रामपंचायत कठोरा (ता. चोपडा) हद्दीतील शासनाच्या मालकीची रिक्त जमीन गरजू, आदिवासी, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी तातडीने वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे चोपडा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

हे निवेदन मुबारक तडवी, तालुकाध्यक्ष, भीम आर्मी भारत एकता मिशन, चोपडा व राहुल जयकर, प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा) यांनी दिले. यापूर्वी 29 ऑक्टोबर 2025 रोजीही अशाच आशयाचे निवेदन देण्यात आले होते; तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने जागावाटप प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत कठोरा येथे अनावश्यक विलंब केला जात आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना घरकुल योजनेंतर्गत जागा मिळण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, शासनाने दुर्बल घटकांसाठी केलेल्या तरतुदींचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

तत्काळ कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. उपोषणामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी ग्रामसेवक सौ. मनीषा महाजन, सरपंच एकनाथ कोळी, तसेच ग्रामपंचायत कठोरा येथील सर्व पंच सदस्य जबाबदार राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), गटविकास अधिकारी (चोपडा), तहसीलदार (चोपडा) व पोलीस निरीक्षक (चोपडा) यांना पाठवण्यात आल्या आहेत.

निवेदन देताना मुबारक तडवी यांच्यासह शहराध्यक्ष मोसीम तडवी, कार्यकर्ते अविनाश साळुंखे आदी उपस्थित होते.

Previous Post

यावलमध्ये उपोषणाला तात्पुरती स्थगिती!तहसीलदार नाझिरकर व प्रकल्प अधिकारी पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा

Next Post

दिल्ली येथे अनुभव आधारित महिला सरपंचांच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातून मोहरद येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी यांची निवड

Next Post

दिल्ली येथे अनुभव आधारित महिला सरपंचांच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातून मोहरद येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..